ओला दुष्काळ जाहीर करून, शेतमालाची नुकसान भरपाई सह संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफ करावे ! छावा क्रांतीवीर सेनेकडून दोन तास चक्काजाम आंदोलन !! मागण्यांचे निवेदन शासनदरबारी मांडण्याचे तहसीलदार यांचे आश्वासनानंतर आंदोलन स्थगित !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

छावा क्रांतीवीर सेनेचे चक्का जाम आंदोलन !
निफाड तहसीलदार यांनी तात्काळ मागण्या शासनदरबारी मांडण्याच्या विनंतीमुळे निवेदन देऊन दोन तासाने आंदोलन स्थगित करण्यात आले.
ओला दुष्काळ जाहीर करून, शेतमालाची नुकसान भरपाई सह संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफ करावे .
               निफाड (५)::-नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीमुळे  नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई व संपूर्ण कर्जमाफी , वीजबिल माफी व  विद्यालयीन , महाविद्यालयीन , उच्च शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण शुल्क माफ करण्यात यावे. अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आली. नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्वत्र अवकाळी पाऊस झाला असून पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. खरिपाची अपरिमित हानी झाली आहे. पिकांचे नुकसान कोट्यवधी रूपयांच्या घरात आहे. यामध्ये द्राक्ष , सोयाबीन , मका, कापूस , कडधान्ये आदी पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने सर्वच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो एकरावरील द्राक्षाचे पीक धोक्यात आले आहे. फुलोरा अवस्थेतील बागा संकटात सापडल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागातील शेतात पाणी साचल्यामुळे शेतातील मका, बाजरी, सोयाबीन, कपाशी, कांदे, कांद्याचे, रोप, टोमॅटो,भुईमूग इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतात उभ्या असलेल्या पिकांसोबतच सोंगणीला आलेले व सोंगुण ठेवलेले पिक पावसामुळे खराब झाले आहे. मका ,बाजरी ,ज्वारी आदींचा चारा सुद्धा सडून गेल्यामुळे चाऱ्याचा सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. पिकांना कोंब फुटले आहे. कांदा पिकाचे सुद्धा नुकसान झाले आहे. कांद्याच्या रोपांसह शेतात लागवड केलेला कांदा सडू लागला आहे. 
        भौगोलीक विस्तार व झालेले नुकसान पाहता पंचनामे करण्यासाठी वेळ कमी आहे. फक्त उभ्या असलेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत आहेत. सोंगणी करून शेतात ठेवलेल्या किंवा वाळत घातलेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे नाकारले जात आहे. बहुतांश शेतकऱ्यांना यामुळे भरपाई पासून वंचित रहावे लागणार आहे. शेतकऱ्यांवर असा अन्याय होऊ नये यासाठी, उभ्या पिकांबरोबरच सोंगणी करून रचून ठेवलेल्या पिकांच्या नुकसानीचेही पंचनामे करावेत.
ग्रामपंचायती मार्फत नैसर्गिक आपत्तीत नुकसानभरपाई साठी १००% पंचनामे करावेत असे ठराव विहीत मार्गाने शासनाकडे मागविण्यात यावे. वेळेत पंचनामे व्हावेत यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे व भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावे. अतिवृष्टीमुळे अर्थव्यवस्थेचा कणा असणारा शेतकरी पुरता कोलमडलेला आहे, त्याला परत उभे करायचे असेल तर कधी नव्हे असे झालेले  नुकसान भरून तर निघणारे नाही परंतु त्याला व आपल्या जगाच्या पोशिंद्याला जगवण्यासाठी भरीव नुकसान भरपाई तातडीने खात्यात जमा करावी अशी विनंती करण्यात आली. त्यामुळे ठोस भूमिका घेऊन तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा देऊन भविष्यात आकस्मित संकटांना सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यावर काय होते ते शासन व प्रशासन आपण चांगले जाणतात, अशी जाणीव करून देण्यात आली.
परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनमध्ये प्रचंड रोष असून त्याचा कधीही भडका होईल याची वाट न पाहता शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन दिलासा द्यावा. अन्यथा मोठ्या जनआंदोलनास शासन, प्रशासनाने तयार रहावे .असा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जाहीर इशारा देण्यात आला. यापुढे आंदोलन हे तीव्र स्वरूपाचे झाल्यास त्याला सर्वस्वी शासन, प्रशासन जबाबदार राहील असेही यावेळी सांगण्यात आले. 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।