आदर्श उपक्रमशील मुख्याध्यापक राज्यस्तरीय पुरस्काराने प्राचार्य के. के. अहिरे यांना गौरविण्यात आले ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!के के अहिरे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
लखमापूर ता दिंडोरी::- येथील विदयालयाचे
प्राचार्य के के आहिरे ह्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ
ह्यांचा राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून नुकताच सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला, त्यांनी ग्रामीण भागातील दिंडोरी तालुक्यातील पहिली आय एस ओ शाळा लोकसहभागातून करण्याचा मान पटकावला आहे, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो, प्रशिक्षणातून तज्ञ मार्गदर्शक, निवडश्रेणी केंद्र संचालक, गणित विषयाचे सातत्याने अध्यापन करीत असून, एसएससी बोर्ड परीक्षक, नियामक म्हणून अनेक वर्षे काम केले आहे, त्यांची दोन पुस्तकेही प्रकाशित झाली असून शैक्षणिक चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे, उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून त्यांचा नावलौकिक असून
वाचन हा त्यांचा मुख्य छंद आहे, विज्ञान प्रदर्शनातही त्यांचे केलेल्या कार्याला अनेक पुरस्कारांनी ह्यापूर्वी गौरवण्यात आले आहे, विद्यार्थी विकासासाठी शाळेत अनेक उपक्रम राबवले त्यात अप्रगत विद्यार्थी, जी तारीख तो पाढा, बॅगलेसडे, ह्यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे, पर्यावरण संवर्धन, बेटी बचाव बेटी पढाव वृक्षसंवर्धन, माता मेळावा, यांचा समावेश आहे,
ते सध्या नासिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष असून त्याना हा पुरस्कार खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी, स्वार्मी मल्लिकार्जुन, आमदार दत्ता सावंत,
शिक्षणसंचालक दिनकर पाटील, महापौर मनोहर सपाटे इ. च्या उपस्थितीत देण्यात आला ह्यावेळी महामंडळ अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, सचिन आदिनाथ थोरात उपस्थित होते त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीराम शेटे, उपाध्यक्ष शिवाजी बस्ते, सचिव बाळासाहेब उगले, निंबा आप्पा देशमुख, सरपंच मंगल सोनवणे,
तनिष्का प्रतिनिधी ज्योती देशमुख, ग्रामस्थ, पालक  यांनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!