२१व्या ग्रामीण साहित्य संमेलनाध्यक्षपदी विवेक उगलमुगले यांची सार्थ निवड !! साहीत्य क्षेत्रातील मंडळींकडून अभिनंदनाचा वर्षाव !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

२१व्या ग्रामीण साहित्य संमेलनाध्यक्षपदी विवेक उगलमुगले यांची निवड
      वाडीवऱ्हे/नाशिक:- इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आयोजित २१व्या ग्रामीण साहित्य समेंलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ  साहित्यिक, समीक्षक आणि कवी विवेक उगलमुगले यांची निवड करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली .
      कवी विवेक उगलमुगले यांचे दिवाण्या आणि तोड्या, सायकलवरच्या कविता, प्रिय आईबाबांच्या शोधात, आठवणींची फुले, सांगवेसे वाटते म्हणून, आतला आवाज हे काव्यसंग्रह, शोध माणूसपणाचा हे व्यक्तिचित्रण यांसह दाट सायीचे गाव, हॅपी होम, रोजनिशी एका चिमुरडीची हे बालसाहित्य प्रकाशित आहे. अनेक पुस्तकांना त्यांची प्रस्तावना असून अनेक पुस्तकांवर समीक्षा लिहिली आहे.
याप्रसंगी मंडळाचे विश्वस्त ग्रंथमित्र बाळासाहेब पलटणे, रवींद्र पाटील, दत्तात्रेय झनकर, अॅड. ज्ञानेश्वर  गुळवे, अॅड. रतनकुमार इचम, हिरामण शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. हे २१वे ग्रामीण साहित्य संमेलन  रविवार दि. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.४० या वेळेत वाडीवऱ्हे,ता. इगतपुरी येथे ३सत्रांत सम्पन्न होत असून सर्व साहित्यिकांनी व साहित्यप्रेमीनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळ तर्फे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !