समाजातील दिव्यांगांच्या उत्कर्षासाठीच्या शिवाश्रम चे २५ डिसेंबर ला लोकार्पण ! राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या स्वप्नातील आश्रमाची डॉ. विजय तनपुरे करीत आहेत स्वप्नपूर्ती !! अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या भव्य सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आयोजकांकडून आवाहन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!
२५ डिसेंबरला शिवाश्रमाचा लोकार्पण सोहळा. विविध क्षेत्रातील मान्यवर लावणार उपस्थिती. नासिक::- महाराष्ट्राचे वैभव, अहमदनगर जिल्ह्यातील व राहुरी नगरीचे भुमिपुत्र असलेले, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय किर्तीचे विश्वशिवशाहिर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्र परिसरात निर्माण करण्यात आलेल्या शिवाश्रमाचा लोकार्पण सोहळा येत्या २५ डिसेंबरला संपन्न होणार आहे. शिवाश्रमासाठी सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे केंद्राध्यक्ष मधुकर गीते व त्यांच्या कुटुंबीयांनी ५० गुंठे जमीन विनामूल्य दान करून अवघ्या नऊ महिन्याच्या कालावधीत या जागेवर ४२०० चौरस फूट आकाराची भव्यदिव्य शिवाश्रम इमारतीची उभारणी झाली आहे. शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांनी त्यांच्या पोवाड्याच्या त्याचबरोबर किर्तन व्याख्यान आदी कार्यक्रमातून जमा झालेले मानधन शिवाश्रमासाठी तसेच आईने शिवाश्रमासाठी जमा करून ठेवलेले एक लाख रुपये तसेच महाराष्ट्रातील विविध दानशूरांनी यथाशक्ती वस्तू व आर्थिक स्वरुपात मदत केली. या सर्वांच्या सहका