पोस्ट्स

महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरणास सुरुवात... शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणपत्रकाचे केले वाटप !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी, निफाड, यांजकडून निफाड तालुक्यात महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरणास सुरुवात... आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप.                 नासिक::-महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे. दि.३० सप्टेंबर २०१९  रोजी थकीत असलेल्या व दि.०१ एप्रिल २०१५ ते दि.३१ मार्च २०१९ या कालावधीत राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्याची  घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पुनर्गठित पीक कर्ज माफ होणार आहे. या योजनेच्या आधार प्रमाणीकरणास निफाड तालुक्यात सुरुवात झालेली असून त्याचा शुभारंभ निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते लाभार्थ्यास प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यादीनुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येत असून प्रमाणपत्र पात्र झालेल्या शेतकरी सभासदांना शासनातर्फे शेतकरी कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरण करताना सोप्या

आज होणाऱ्या सुर्यग्रहणाचे राशीनुसार फल काय आहे ! जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
कंकणाकृती सूर्यग्रहण रविवार दि. २१ जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होत आहे. भारतासह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, दक्षिण युरोपचा काही भाग आणि आॅस्ट्रेलियाचा उत्तरेकडील प्रदेश या प्रदेशांमध्ये ग्रहण दिसणार आहे. पृथ्वी, चंद्र आणि सूर्य जेव्हा एकाच रेषेत येतात तेव्हा जी आकाशिय स्थिती निर्माण होते तिला सुर्यग्रहण म्हणतात, पृथ्वीपासून चंद्र कमाल अंतरावर असतो तेव्हा कंकणाकृती ग्रहण म्हटले जाते, राजस्थान, पंजाब, हरियाना व उत्तराखंडातील काही प्रदेशात कंकणाकृती अवस्था पाहाण्यास मिळेल. पृथ्वीपासून किमान अंतरावर चंद्र असल्यास खग्रास सूर्यग्रहण होते, यांत सूर्य पुर्णपणे झाकला जातो,  शनिवार दि. २० जून रोजी रात्री १० पासुन ते ग्रहण मोक्षापर्यत अर्थात भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० ते २:०७. (वेगवेगळ्या ठिकाणांहून मोक्षवेळेत बदल राहील)  वेध पाळावेत. बाल, वृध्द, आजारी, अशक्तव्यक्ती व गर्भवती स्त्रियांनी रविवारी पहाटे ४ वा.४५ मि.पासुन ग्रहण मोक्षापर्यत वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, नित्यकर्म , देवपुजा, श्राध्द, ही कर्मे करता येतात तर काहींच्या मते ही कर्मे वर्ज मानली जातात. वेधकाळा

 सैनी जोती महासंघाच्या  राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड......! माळी समाजाचे राष्ट्रीय संघटन मजबूत करणाऱ्या सैनी जोती च्या कुणाची वर्णी लागली !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
विजय राऊत यांची सैनी जोती महासंघाच्या  राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड......               नाशिक:  देशभरातील माळी समाजाचे राष्ट्रीय संघटन मजबूत करण्याचे काम सैनी जोती महासंघ करत आहे. या संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी महाराष्ट्रामधून विजय राऊत यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.         माळी समाजाचे ज्येष्ठ नेते विजय राऊत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाज संघटनाच्या माध्यमातून राज्यभरात कामाचा वेगळा ठसा उमटवला असल्याने त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्साहात पार पडली असून या बैठकीमध्ये देशातील विविध राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये समाजाच्या समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर सैनी जोती महासंघाचा देशभरात दौरा करण्यात येणार असल्याची माहिती विजय राऊत यांनी दिली. राऊत यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. ब्रिजेश ट्विकल सैनी, संवरक्षक ताराचंद गेहलोत, मोतीबाब साखला, उत्तराखंड धर्मवीर सैनी, मुरली बालन, महेश सैनी मध्यप्रदेश, मुन्नालाल सैनी छत्तीसगड,

शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या शाळेला कोरोना प्रतिबंधक साहित्य भेट ! तरूणांकडून आदर्शाची रुजवणी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी, निफाड यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस _____________________________________ शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी रायतेवस्ती शाळेला कोरोना प्रतिबंधक साहित्य भेट, विकास रायते व संतोष रहाणे यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम             निफाड::-  तालुक्यातील उत्तर पुर्व पट्ट्यातील खडकमाळेगाव येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद शाळा रायतेवस्ती शाळेस जाणता राजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष विकास रायते व शिक्षणप्रेमी तरूण संतोष रहाणे यांनी "माझा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेत" या उपक्रमातंर्गत वाढदिवसानिमित्त थर्मल स्कॕनर, हँड फ्री सॕनिटायझर स्टँड भेट दिले तर बालरोगतज्ञ डॉ.मंगेश रायते यांनी सर्व विद्यार्थ्यांना मास्क भेट दिले.          १५ जुन रोजी नवीन शैक्षणिक सत्राची सुरूवात झाली परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात कधी सुरू याबाबत अनिश्चितता आहे परंतु शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याची आवश्यकता लक्षात घेत साहित्य भेट दिले.          गेल्या तीन महिन्यांपासून शाळा बंद असल्याकारणाने शाळा निर्जंतुकीकरणासा

जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव !                नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.       नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात ! न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त

कोविड-१९ वर मात केलेल्यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक  : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत.  आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांनी निफाड, येवला, चांदवड  व मनमाड येथे भेट देवून त्यांनी कोरोनाबाबत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. मनमाड येथील कोव्हीड-१९ केअर सेंटरला भेट देवून कोव्हीड आजारातून बरे झालेल्या ९ रुग्णांचे लीना बनसोड यांनी गुलाबाचे फुल देऊन अभिनंदन केले. आजारातून बरे झाल्याने या रुग्णांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, गंभीर आजाराच्या रुग्णांना आठवडयातून दोनदा भेट देऊन तापाची तसेच रक्तातील ऑक्सिजनच्या प्रमाणाची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.        ग्रामीण पातळीवर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध् उपाययोजना करण्यात येत आहेत. हॉटस्पॉट असलेल्या ८ ठिकाणी जिल्हास्तरावरून संपर्क अधिका-यांची नियुक्ती करुन विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या,  अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती, पाणी पुर

चमचे पत्रकार !खरंच पत्रकार चमचे असतात का ? चमचे असतील तर त्यांना पत्रकार म्हणावे का ? चमचेगिरी पत्रकार करतात असे असेल तर पत्रकारितचे काय होईल ? आणि असं जर खरं मानले तर एखाद्याची आत्महत्या होऊ शकते का ? ,,,,,,,,,,,,,,, वाचा, न्यूज मसाला चे आजचे संपादकीय ! सविस्तर वाचण्यासाठी व बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
चमचे पत्रकार ! खरंच पत्रकार चमचे असतात का ? चमचे असतील तर त्यांना पत्रकार म्हणावे का ? चमचेगिरी पत्रकार करतात असे असेल तर पत्रकारितचे काय होईल ? आणि असं जर खरं मानले तर एखाद्याची आत्महत्या होऊ शकते का ? ,,,,,,,,,,,,,,, वाचा, न्यूज मसाला चे आजचे संपादकीय

सहाय्यक अभियंता लाचलुचपत च्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
सहाय्यक अभियंता लाचलुचपत च्या जाळ्यात ! पंचायत समिती बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता आज दि. १७ जून २०२० रोजी लाचलुचपत विभागाच्या यशस्वी सापळ्यात रंगेहाथ पकडण्यात आला.          शहादा पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता ईश्र्वर सखाराम पटेल याने ठेकेदाराचे बील मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली होती. ठेकेदाराने तातुक्यातील टेंभली पेसा अंतर्गत होळगुजरी गृप ग्रामपंचायत येथील मुतारी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा हाळ तसेच त्यानुषंगीत कामांचे सहा लाख त्रेचाळीस हजारांचे काम पूर्ण केले होते त्यातील ५ लाख ४३ हजारांचे बीलाचे फाईलवर सहाय्यक अभियंता ईश्र्वर पटेल याने स्वाक्षरी करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच आज दि. १७ जून २०२० रोजी पंचायत समितीच्या कार्यालयात पंच साक्षीदारांसमक्ष स्विकारली असता लाचलुचपत विभागाच्या वतीने रंगेहाथ पकडण्यात आले.          सदर कारवाई पो. उप अधीक्षक शिरीष जाधव, पो. निरिक्षक जयपाल अहीरराव, हेकाॅ. उत्तम महाजन, संजय गुमाणे, पो. ना. दीपक चित्ते, संदीप नावडेकर, मनोज अहीरे, अमोल मराठे, ज्योती पाटील यांच्या पथकाने केली व गुन्हा दाखल करण्यात आ

सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त असलेल्या ६ संवर्गांतील ३१८ कर्मचा-यांना सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ मंजुर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक – जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त असलेल्या ६ संवर्गांतील ३१८ कर्मचा-यांना सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ मंजुर करण्यात आला आहे. एकाचवेळी ३१८ कर्मचा-यांचा लाभ मंजुर केल्याने जिल्हा परिषद कर्मचा-यांमध्ये समाधान व्यकत करण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या सर्व संवर्गिय संघटनांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. जिल्हा परिषदेत विविध विभागात कार्यरत कर्मचा-यांना शासन निर्णयानुसार सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेअंतर्गत १० वर्ष सेवा झाल्यावर पहिला, २० वर्ष सेवा झाल्यावर दुसरा तर ३० वर्ष सेवा झाल्यावर तिसरा लाभ देण्यात येतो. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागांतर्गत विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेचा पहिला, दुसरा व तीसरा  लाभ मंजुर करण्यात आला आहे. यामध्ये परिचर २३६, कनिष्ठ सहाय्यक ६०, कनिष्ठ प्रशासन अधिकारी  १०, सहाय्यक प्रशासन अधिकारी २, वरिष्ठ सहाय्यक ५, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ४ , परिचर यांना लाभ मंजुर करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली. विहित वेळेत पारदर्शक

चौकशी समिती पुढील आव्हाने !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
चौकशी समिती पुढील आव्हाने !! प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी उपाय राबविण्यात येत असतात, मात्र राजकीय, आर्थिक हितसंबंध जोपासत प्रशासकीय यंत्रणेचा बळी दिला जातो, या बळींमध्ये सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचे प्रमाण जास्त आढळून येते, यांत अन्याय होऊ नये म्हणून चौकशी समिती गठीत करण्यात येतात, चौकशी समित्याही किती निष्पक्षपणे काम करतात हाही संशोधनाचा विषय आहे. याला नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड या अपवादात्मक ठरताना दिसत आहेत. एक तपाहून अधिकचा काळ त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. अशा अधिकाऱ्यांची तळमळ समाजासाठी निश्र्चितच लाभदायक ठरते. असे अनेक अधिकारी आजमितीस प्रशासनात आहेत, त्यांना प्रशासनातील इतर घटकांचे आवश्यक पाठबळ लाभले तर विकासाची कास धरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय विभागांचे कार्य कौतुकास्पद होईल, मात्र प्रशासनवरील राजकीय पकड ही अनैतिक कामासाठी जास्त वापरात येते याचाच फटका शहराला, जिल्ह्याला, राज्याला परिणामी देशाला बसतो, गेल्याच आठवड्यात नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका स