सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त असलेल्या ६ संवर्गांतील ३१८ कर्मचा-यांना सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ मंजुर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक – जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त असलेल्या ६ संवर्गांतील ३१८ कर्मचा-यांना सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ मंजुर करण्यात आला आहे. एकाचवेळी ३१८ कर्मचा-यांचा लाभ मंजुर केल्याने जिल्हा परिषद कर्मचा-यांमध्ये समाधान व्यकत करण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या सर्व संवर्गिय संघटनांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
जिल्हा परिषदेत विविध विभागात कार्यरत कर्मचा-यांना शासन निर्णयानुसार सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेअंतर्गत १० वर्ष सेवा झाल्यावर पहिला, २० वर्ष सेवा झाल्यावर दुसरा तर ३० वर्ष सेवा झाल्यावर तिसरा लाभ देण्यात येतो. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागांतर्गत विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेचा पहिला, दुसरा व तीसरा  लाभ मंजुर करण्यात आला आहे. यामध्ये परिचर २३६, कनिष्ठ सहाय्यक ६०, कनिष्ठ प्रशासन अधिकारी  १०, सहाय्यक प्रशासन अधिकारी २, वरिष्ठ सहाय्यक ५, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ४ , परिचर यांना लाभ मंजुर करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली.
विहित वेळेत पारदर्शक पध्दतीने कर्मचा-यांना लाभ मंजुर केल्याबाबत सर्व संवर्गिय कर्मचारी संघटनांचे वतीने व जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना यांचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांचे आभार मानले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गटविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

एकदा सर्वांनी कवयित्री फरझाना इकबाल यांची पंढरीच्या "विठ्ठलाच्या भेटीसाठी मन विठाई विठाई" रचना ऐकायला हवी !