२७ मे रोजी शिवशंभूप्रेमींच्या भेटीला "सरसेनापती हंबीरराव मोहिते". "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" !
महाराष्ट्राचा महासिनेमा ‘सरसेनापती हंबीरराव’ २७ मे रोजी येणार शिवशंभूप्रेमींच्या भेटीला ! नाशिक ( प्रतिनिधी ) सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या महाराष्ट्राच्या महासिनेमाची घोषणेपासूनच जगभरातील शिवशंभूप्रेमींच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली होती. अंगावर रोमांच उभे करणाऱ्या "हंबीर तू..." या गाण्याने ती अजून वाढली. "सरसेनापती हंबीरराव" च्या ट्रेलरमुळे ही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. २७ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे अशी माहिती प्रवीण तरडे यांनी पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली. "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" असे जबरदस्त संवाद आणि धमाकेदार ऍक्शन सिक्वेन्स असलेल्या या चित्रपटातून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्यासाठी गाजवलेले अतुलनीय शौर्य पाहायला मिळणार आ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा