जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव !
               नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.
      नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात !
न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या कामासाठीच बाहेर पडा ! घरी रहा-स्वस्थ रहा- साऱ्यांसह !!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"ध्येयप्राप्ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यास मनाची जी अवस्था तुम्हाला प्रेरणा देत असते ती म्हणजे आत्मविश्वास.". निशा डांगे यांनी शब्दबद्ध केलेल्या आत्मविश्वास बाबत सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है !आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय गणिती रामानुजन यांच्या मते मैत्री २२० आणि २८४ प्रमाणे असते ! राॅबीन डनबार यांचे मैत्रीसाठी सांख्यिकीय विश्लेषण !

रक्तातही भ्रष्टाचार? कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले !