सैनी जोती महासंघाच्या  राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड......! माळी समाजाचे राष्ट्रीय संघटन मजबूत करणाऱ्या सैनी जोती च्या कुणाची वर्णी लागली !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

विजय राऊत यांची सैनी जोती महासंघाच्या  राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड......

              नाशिक:  देशभरातील माळी समाजाचे राष्ट्रीय संघटन मजबूत करण्याचे काम सैनी जोती महासंघ करत आहे. या संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी महाराष्ट्रामधून विजय राऊत यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

        माळी समाजाचे ज्येष्ठ नेते विजय राऊत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाज संघटनाच्या माध्यमातून राज्यभरात कामाचा वेगळा ठसा उमटवला असल्याने त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्साहात पार पडली असून या बैठकीमध्ये देशातील विविध राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये समाजाच्या समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर सैनी जोती महासंघाचा देशभरात दौरा करण्यात येणार असल्याची माहिती विजय राऊत यांनी दिली. राऊत यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. ब्रिजेश ट्विकल सैनी, संवरक्षक ताराचंद गेहलोत, मोतीबाब साखला, उत्तराखंड धर्मवीर सैनी, मुरली बालन, महेश सैनी मध्यप्रदेश, मुन्नालाल सैनी छत्तीसगड, अनिल सैनी पंजाब, आझाद सैनी दिल्ली, सुभाष चंद्र उत्तरप्रदेश यांनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

त्र्यंबकेश्वरमध्ये अतिक्रमणांवर कारवाई सुरू; कुंभमेळ्यापूर्वी दर्शन मार्ग मोकळा करण्यास गती

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

चमचे पत्रकार !खरंच पत्रकार चमचे असतात का ? चमचे असतील तर त्यांना पत्रकार म्हणावे का ? चमचेगिरी पत्रकार करतात असे असेल तर पत्रकारितचे काय होईल ? आणि असं जर खरं मानले तर एखाद्याची आत्महत्या होऊ शकते का ? ,,,,,,,,,,,,,,, वाचा, न्यूज मसाला चे आजचे संपादकीय ! सविस्तर वाचण्यासाठी व बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!