माजी आमदाराच्या प्रयत्नाने शहरविकासासाठी पाच कोटींचा निधी आणण्याच्या प्रयत्नांना यश ! शहराच्या विकासासाठी आजी-माजी सत्ताधारी पक्षांच्या आमदारांमध्ये स्पर्धा !! कोणत्या शहराच्या विकासासाठी होत आहे स्पर्धा, सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस, माजी आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नाने निफाड शहराच्या विकास कामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर निफाडचा विकासासाठी आजी-माजी आमदारांमध्ये स्पर्धा नासिक::-जिल्ह्यातील निफाड शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी माजी आमदार अनिल कदम यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नाशिकचे पालकमंत्री छगनराव भुजबळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निफाड शहराच्या विकासकामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर केले आहे.! त्यामुळे निफाडकरांनी समाधान व्यक्त केले. नगरपालिकांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी ठोस तरतूद विशेष अनुदान या योजनेअंतर्गत लेखाशीर्ष-४२१७०६०३/२०२० अंतर्गत माजी आमदार अनिल कदम यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत निफाड च्या विकासासाठी आमदार नसलो तरी तालुक्याच्या विकासासाठी आपण मागे नाही हे माजी आमदार अनिल पाटील कदम यांनी पाच कोटी निधी आणत जनतेला दाखवून दिले. सदर निधी मंजूर केला असल्याबाबतचे व अनिल कदम यांचे पत्र व मंजूर विकासकामांचा शासन निर्णय निफाड नगरपंचायतीला नुकताच प्राप्