सामान्य रुग्णालयाची स्थापना ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी स्थापन करण्यात आली असून अत्यवस्थ संदर्भित रूग्णांना दाखल करून घेण्याचे निर्देश देण्यात यावेत-जिल्हा परिषद अध्यक्ष !!

           नासिक::- ग्रामीण भागातील कोरोणाग्रस्त रुग्णांना सामान्य रुग्णालय नाशिक व नाशिक शहरातील खाजगी रुग्णालय कोविड सेटर येथे दाखल करुन घेणेबाबत नासिक चे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी विनंतीपत्राद्वारे मागणी केली.
        नाशिक जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागामध्ये कोरोना बाधीत रुग्णावर उपचार स्थानिक स्तरावर सुरु आहेत. परंतु जे रुग्ण अत्यवस्थ होतात अशा रुग्णांना जिल्हा स्तरावरील शासकिय रुग्णालय येथे संदर्भित करण्यात येते. परंतु ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांना संदर्भित केल्यावर देखील सदर रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक व वैद्यकिय महाविदयालय नाशिक येथे दाखल करुन घेतले जात नसल्याबाबत मोठया प्रमाणात तक्रारी येत आहेत. सामान्य रुग्णालयाची स्थापना हि ग्रामीण भागातील जनतेसाठी आरोग्य सुविधा पुरविणे कामी स्थापन करण्यात आलेली असताना ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा मिळत नाही. नाशिक शहरातील काही खाजगी रुग्णालय हे कोवीड सेंटर म्हणून घोषित करण्यात आलेली असून त्यांचे संपूर्ण नियंत्रण हे महानगर पालिका आरोग्य विभागाकडे असल्यामुळे त्याठिकाणी सुध्दा ग्रामीण भागातील रुग्ण आल्यावर रुग्णांना दाखल करुन घेतले जात नाही. याबाबत ग्रामीण भागातुन  मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या असुन मानवतेच्या दृष्टीकोनातून हि बाब अत्यंत खेदजनक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेवर एकप्रकारे मोठा अन्याय होत आहे. नाशिक जिल्हयातील ग्रामीण भागातून संदर्भित करण्यात आलेल्या अत्यवस्थ असलेल्या किंवा तालुका स्तरावरुन जिल्हा स्तरावर संदर्भित केलेल्या कोरोना रुग्णांना खाटा व व्हेन्टिलेटर सुविधा पुरविणे कामी आपले स्तरावरुन योग्य ती कार्यवाही होणेकामी संबधीत यंत्रणेस निर्देश व्हावेत अशा विनंतीचे पत्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

२७ मे रोजी शिवशंभूप्रेमींच्या भेटीला "सरसेनापती हंबीरराव मोहिते". "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" !

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!

बालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जि.प.