१३०४९ रक्तदात्यांचे रक्तदान !! २९ वर्षांपासून रक्तदान यज्ञ होत आहे साजरा !! निमित्त- वडील व दोन मोठ्या भावांच्या स्मृतीप्रित्यर्थ !!! आजच्या ५०५ दात्यांमध्ये सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व्यक्तिंचा समावेश !!!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

आमदार बनकर यांच्या रक्तदान यज्ञास पिंपळगावी ५०५ रक्तदात्यांचे रक्तदान
संतोष गिरी निफाड,
न्यूज मसाला सर्विसेस,
       नासिक::- निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे आज तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांच्या वडील व दोन मोठे भाऊ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गत अनेक वर्षापासून सुरू असलेला रक्तदान महायज्ञ  सोहळ्याच्या आवाहनाला तालुक्यातील रक्तदात्यांनी उत्तम प्रतिसाद देत सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत  रक्तदान शिबिरात ५०५ नागरिकांनी रक्तदान केल्याने ५०५ रक्त बाटल्यांचे संकलन झाले, आजपर्यंत १३०४९ इतक्या रक्त बाटल्यांचे संकलन नाशिक येथील अर्पण रक्तपेढी ला बनकर यांच्या माध्यमातून आजपर्यंत झालेले आहे. तर आमदार दिलीप बनकर यांच्या रक्तदानाचा फायदा हा सर्वसामान्य जनते समोर  तालुक्यातील रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांना नाशिक येथील अर्पण रक्तपेढी मध्ये जाऊन होतो, जेव्हा ही निफाड  तालुक्यातील  रुग्णांना गरज लागते तेव्हा हक्काने अर्पण रक्त पेढी मध्ये बनकर यांच्या   मार्गदर्शनाखाली संबंधित रुग्णाला रक्त पुरवठा विनामूल्य होत असल्याने आमदार बनकर यांनी घेतलेला हा सामाजिक वसा गत अनेक वर्षा सुरू असल्याने या  कार्यातून सर्वसामान्याना रुग्णालयात तात्काळ रक्ताचा पुरवठा होत असतो, या रक्तदानाचे तालुक्यातच नाही तर राज्यभरातून अभिनंदन होत असते, या रक्तदान प्रसंगी तालुक्यातील घराघरांतून, प्रशासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून रक्तदान केले. तर उपस्थितांमध्ये लासलगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा उद्योजक डि.के. नाना जगताप, निसाका चे माजी अध्यक्ष तानाजी बनकर, मविप्र चे सभापती माणिकराव बोरस्ते, युवा नेते प्रणव पवार, निफाड पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष कराड,  मविप्र चे माजी संचालक विश्वास मोरे, समता परिषदेचे ज्येष्ठ नेते सुरेश खोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे,  मविप्र ते नाशिक संचालक नानासाहेब महाले,  नाशिक जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर, पिंपळगाव चे माजी उपसरपंच संजय मोरे, अशोकराव बनकर पतसंस्थेचे संचालक बाळासाहेब बनकर, अशोकराव बनकर पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ माळोदे, सायखेड गटाचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर,  चांदोली गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, निफाड पंचायत समिती सदस्य गुरुदेव कांदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दीपक बोरस्ते, सारोळे खुर्द सरपंच दत्तात्रय पाटील डुकरे, पिंपळगाव बाजार समितीचे संचालक निवृत्ती धनवटे, नंदकुमार सांगळे, राजेंद्र कुटे, संपतराव विधाते, लक्ष्मण खोडे, बाळा बनकर, गफ्फार शेख, साहेबराव देशमाने, , शिवाजी संधान, नंदू गांगुर्डे, विलास बोरस्ते, अनिल बोरस्ते, नारायण पोटे, अजय गायकवाड, शंकरलाल ठक्कर, साहेबराव मोरे,, चंद्रकांत बनकर,  उत्तम कुंदे, किरण निरभवने, रमेश घुगे, संजय वाळुंज, भाऊलाल कुटे, नवाज  काझी, बापू कडाळे, अश्विन गागरे पाटील, साहेबराव मोरे, जगन्नाथ खोडे, विलास मंडलिक, संदेश सानप, अरुण घोटेकर, जयराम मोरे, दिलीप देशमाने, शंकरराव बनकर, राजेंद्र खोडे, डॉ.महेश बुब, माधवराव ढोमसे, गणपत हाडपे, भास्कर सोनवणे, संजय सांगळे, विजय कारे, डॉ. हेमंत दळवी,  दीपक मोरे , रामकृष्ण खोडे, दीपक विधाते, अल्पेश पारख, शाम निरभवने, गणेश गोराडे, साहेबराव खालकर, हेमंत सानप, बाबुराव सानप, ज्ञानेश्वर पाणगव्हाणे, अनिल क्षीरसागर, मोहन खापरे,सचिन पिंगळे,  सावरगाव सहकारी सेवा सोसायटीचे माजी सभापती गोविंद कुशारे सावरगाव चे माजी सरपंच संजय कुशारे, भाऊसाहेब कुशारे, बाळासाहेब कुशारे , प्रदीप कुशारे आधी राजकीय तर प्रशासकीय अधिकारी  निफाडच्या प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी माधव  पर्डिले, निफाड आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतन काळे सह तालुक्यातील विविध कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
*************************************
२९ वर्षापासून सुरु असलेला हा रक्तदान महायज्ञ दादा ,अण्णा, आप्पा ,यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करून कुटुंबाचे व आपले दुःख कमी करण्याचा तर समाजाच्या दृष्टीने या दुःखातून समाजासाठी  काहीतरी करण्याची उमेद मिळण्यासाठी हा उपक्रम राबवत असताना बनकर कुटुंबियाच्या मागे संपूर्ण तालुका ज्या पद्धतीने उभा राहतो ते बघून मन भरून येते तरी अशीच आपुलकी व जनतेचा आशीर्वाद यापुढेही मिळत राहो हीच निफाड करा कडून अपेक्षा
दिलीप बनकर आमदार निफाड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!