माजी आमदाराच्या प्रयत्नाने शहरविकासासाठी पाच कोटींचा निधी आणण्याच्या प्रयत्नांना यश ! शहराच्या विकासासाठी आजी-माजी सत्ताधारी पक्षांच्या आमदारांमध्ये स्पर्धा !! कोणत्या शहराच्या विकासासाठी होत आहे स्पर्धा, सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !

संतोष गिरी यांजकडून
न्यूज मसाला सर्विसेस,
माजी आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नाने निफाड शहराच्या विकास कामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर
निफाडचा विकासासाठी आजी-माजी आमदारांमध्ये स्पर्धा
        नासिक::-जिल्ह्यातील निफाड शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी माजी आमदार अनिल कदम यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नाशिकचे पालकमंत्री छगनराव भुजबळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निफाड शहराच्या विकासकामांसाठी  पाच कोटी रुपये मंजूर केले आहे.! त्यामुळे निफाडकरांनी समाधान व्यक्त केले.
           नगरपालिकांना  वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी ठोस तरतूद विशेष अनुदान या योजनेअंतर्गत लेखाशीर्ष-४२१७०६०३/२०२० अंतर्गत माजी आमदार अनिल कदम यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत निफाड च्या  विकासासाठी आमदार नसलो तरी तालुक्याच्या विकासासाठी आपण मागे नाही हे माजी  आमदार अनिल पाटील कदम यांनी पाच कोटी निधी आणत जनतेला दाखवून दिले. सदर निधी मंजूर केला असल्याबाबतचे  व अनिल कदम यांचे पत्र व मंजूर विकासकामांचा शासन निर्णय निफाड नगरपंचायतीला नुकताच प्राप्त झाला असल्याने पाच कोटी रुपयांच्या या भरीव निधीमध्ये अमरधाम स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच सरस्वती नगरमधील गट नंबर १७ मधील मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्यासाठी २५ लक्ष, सी.एन ३७४ गट नंबर १७२९, १७३०, १७३१, १७३२ या मधील मंजूर रेखांकणातील मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्यासाठी सुमारे ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रुणवालनगर येथील गट नंबर ३८७ व ३६७ मधील मोकळ्या जागेत उद्यान-बगीचा विकसित करण्यासाठी ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. होळकरनगर दुर्गा माता मंदिर येथेही उद्यानासाठी २५ लक्ष व शांतीनगर उद्यानासाठी २५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. गणेशनगरमधील ३८४/२५ - ३८५/२५ मंजूर रेखांकणातील मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्यासाठी २५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. निफाड शहरातील आदिवासी स्मशानभूमीस वॉलकंपाउंड, प्रवेशद्वार व सुशोभीकरणासाठी ४०लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. निफाड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक काँक्रिटीकरणासाठी ६० लक्ष तर फिल्टर प्लांट इदगाहकडे जाणाऱ्या पुलासाठी ४० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. इदगाहसमोर भिंत व काँक्रिटीकरण करण्यासाठी ४० लक्ष तर कोळवाडी रोड चारी रस्त्यासाठी २० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.
           निफाड शहराच्या विकासकामांसाठी अनिल कदम यांनी पाच कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याने नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे, उपनगराध्यक्ष स्वाती गाजरे, जेष्ठ नेते राजाभाऊ शेलार, नगरसेवक अनिल कुंदे, संजय दादा कुंदे, मुकुंदराजे होळकर, देवदत्त कापसे, आनंद बिवालकर, सुनिता कुंदे, संदीप जेऊघाले, किरण कापसे, विक्रम रंधवे, लक्ष्मी पवार, संजय धारराव, ललित गिते, अभिजित चोरडिया, बापु कापसे, रावसाहेब कुंदे, तुकाराम ऊगले, दिपक गाजरे, रतन गाजरे, संदीप गाजरे, शैलेश जाधव, धनंजय कुंदे, योगेश कुंदे, भोई वकील, किशोर जावरे, निखिल व्यवहारे आदींसह नागरिकांनी विशेष आभार मानले आहे.
************************************
निफाडसह तालुक्याच्या विकासासाठी कटीबद्ध : अनिल कदम
       राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आपण सदैव निफाड शहरासह तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने ५ कोटींचा निधी मंजूर झाल्याने निफाडच्या नगरसेवकांना दिलेला विकासाचा शब्द पूर्ण केल्याचे समाधान आहे. यापुढेही आपण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहोत.!
          अनिल कदम(माजी आमदार)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!