पुण्यस्मरणानिमित्ताने भक्ताने पुतळ्यावरील अंधार केला दूर ! कोणी व कसा केला पुतळ्यावरील अंधार दूर व त्यावरील प्रतिक्रिया सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

संतोष गिरी यांजकडून,
न्यूज मसाला सर्विसेस,
         नासिक::- निफाड तालुक्यातील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना अर्थात रासाकाच्या कार्यस्थळावर कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा पूर्णाकृती पुतळा गत अनेक वर्षांपासून रासाकाचा  वीजपुरवठा खंडित असल्याने अंधारात असल्याने कर्मवीर प्रेमींमध्ये नाराजीची भावना संपूर्ण तालुक्यात होती. ही जन भावना रासाका चे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे यांच्या लक्षात आली. त्यात दत्तात्रय पाटील अध्यक्ष असताना कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा पूर्णाकृती पुतळा महाराष्ट्र राज्याचे दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते व दिवंगत लोकनेते मालोजीराव मोगल यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत वीस वर्षांपूर्वी रासाका कार्यस्थळावर उभारण्यात आला होता, रासाका बंद असल्याने   पुतळ्याची देखभाल होत नसल्याने कर्मवीरांच्या या पुतळ्याला कोणीच वाली नसल्याचे चित्र होते, पुतळा कायम अंधारात होता, कर्मवीरांनी या परिसरात सर्वप्रथम वीज आणून  या परिसराला उजेडात आणले त्यांचाच पुतळा आज अंधारात असल्याची बाब डुकरे  पाटील यांना खटकत होती म्हणूनच आज त्यांच्या पुण्यस्मरणा निमित्त त्यांनी कार्यस्थळावर पुतळ्याला उजेडात आणण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बल्बकीट  बसविण्याचा निर्णय घेतला असल्याने, रासाका परिसरातील नागरिकांनी व कर्मवीर प्रेमींनी निर्णयाचे स्वागत केले. डुकरे पाटीला यांनी कर्मवीरांचेप्रती असीम त्यागाची जाणीव ठेवल्याची चर्चा आज तालुक्यात होती.
**************************************
प्रतिक्रिया
_____________________________________
दत्तात्रय पाटील डुकरे _=_ माजी अध्यक्ष, कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना 
  जा कर्मवीरांच्या  असीम  त्यागातून रानवडच्या उजाड माळरानावर रासाका, निसाका, मविप्र, कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था, पिंपळगाव एज्युकेशन सोसायटी, पालखेड डावा कालवा तालुक्यातील रस्ते अशी अनेक कामे आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर करणाऱ्या कर्मवीरांचा पुतळा अंधारात असल्याची बाब खटकत होती म्हणूनच आज त्यांच्या पुण्यस्मरणार्थ दिनाच्या निमित्ताने तेथे प्रकाश आणण्याचा छोटासा प्रयत्न केला.
_______________________________________
   दगूआण्णा शिंदे रासाका   = सभासद नांदुर्डी
रासाकाचे  माजी चेअरमन दत्तात्रय पाटील डुकरे यांनी कर्मवीरांच्या पुतळ्या बाबत चांगला निर्णय घेतला तो स्थानिक जनतेला घेता आला नाही, ज्यांनी हा पुतळा उभारला त्यांनीच पुतळा उजेडात आणला तरी डुकरे पाटलांच्या या उपक्रमातून स्थानिक नेतृत्वाने वा जनतेने पूर्णाकृती पुतळ्यावर छत्री व सावली उभारण्याचा निर्णय घेतला, यामुळे कर्मवीर प्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)