पोस्ट्स

आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात समतोल बिघडणार असल्याने जिल्हा परिषदेने सार्वत्रिक बदली प्रक्रिया रदद केली !! न्यूज मसाला संपर्क क्रमांक 7387333801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक- जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या रिक्त पदांमुळे बदली प्रक्रिया केल्यास आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात समतोल बिघडणार असल्याने जिल्हा परिषदेने सार्वत्रिक बदली प्रक्रिया रदद केली आहे. नियमानुसार आपसी बदल्या १० ऑगस्टपर्यत करण्यात येणार आहे.                      शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार वर्ग ३ संर्वगातील सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यासाठी १० ऑगस्टपर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विविध विभाग निहाय बदली प्रक्रियेचा आढावा घेतल्यावर गेल्या चार वर्षापासून पदभरती न झाल्यामुळे तसेच आरक्षण पदावरची पदोन्नतीबाबत शासनाने दिलेल्या स्थगितीमुळे मोठया प्रमाणात पद रिक्त असल्याचे निर्दशनास आले आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये सध्या पदे रिक्त असून विनंती बदलीने पुन्हा आदिवासी क्षेत्रातीलच पदे रिक्त होण्याची शक्यता आहे. आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासकीय बदलीने बिगर आदिवासी क्षेत्रातून मोठया प्रमाणात बदल्या कराव्या लागतील. त्यामुळे बिगर आदिवासी क्षेत्रातील पदे मोठया प्रमाणात रिक्त होऊन त्या भागातील समतोल बिघड

धनगर ऐक्य अभियान -- धनगर समाज सरकारला देणार स्वतःच्या रक्ताने लिहून निवेदन - डॉ शशिकांत तरंगे ! १३ आॅगस्ट राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी दिनी देणार निवेदन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य.. धनगर समाज सरकारला देणार स्वतःच्या रक्ताने लिहून निवेदन - डॉ शशिकांत तरंगे १३ ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक तहसील कार्यालय वरती धनगर समाज बांधव धनगर ऐक्य अभियान मार्फत राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये स्व:ताच्या रक्ताने लिहून निवेदन देणार आहे     .....निवेदन मधील विषय.... धनगर समाज STआरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करा ! धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करा व 1000 कोटीची तरतूद ताबडतोब करा. मेंढपाळांना संरक्षण द्या त्याच्यावर होणारे हाल्ले थांबवा. यासाठी राज्यभरातून आपल्या मागण्यांसाठी धनगर बांधव स्वतःच्या रक्ताने निवेदन लिहून मे. तहसीलदार मार्फत राज्य सरकारला निवेदन देणार आहे, यामध्ये सरकारला पंधरा दिवसाचा वेळही ही दिला जाणार आहे. अन्यथा पंधरा दिवसानंतर राज्यभर महा विकास आघाडी सरकार विरोधात धनगर समाज अतिशय उग्र आंदोलन घोषित करणार असल्याचे डॉ शशिकांत तरंगे यांनी जाहीर केले...

न्यूज मसाला दि. ६ आॅगस्ट २०२० चा प्रकाशित अंक

इमेज
न्यूज मसाला दि. ६ आॅगस्ट २०२० चा प्रकाशित अंक

शेतकरी कुटुंबातील कांचन बनली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
शेतकरी कुटुंबातील कांचन बनली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक !  नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (तांत्रिक) परीक्षा चा निकाल जाहीर झाला असून  निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील  कांचन शंकर आवारे हिने सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.           कांचन ही शेतकरी व सर्वसामान्य घरातील मुलगी असून तिचे शालेय शिक्षण चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये व त्यांनतर मेकॅनिकल डिप्लोमा हा चांदोरी येथील कर्मवीर काकासाहेब वाघ आभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केला, पदवी शिक्षण नाशिक येथील गोखले  महाविद्यालयात पूर्ण केले, कांचन ने  पदवी महाविद्यालयात प्रवेश घेतल्या बरोबरच स्पर्धा परीक्षा चा अभ्यास सुरू केला. महाविद्यालयातील अभ्यासिका व घरी अभ्यास करीत २०१७ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. काही  कारणास्तव त्याचा निकाल जाहीर होण्यास विलंब झाला होता. मोठ्या प्रतिक्षेनंतर निकाल जाहीर झाला व त्यात कांचनने यशाला गवसणी घातल्याचे घोषित झाले, यांत अरुण नागरे ,महेंद्र धनाईत ,अमोल टाके यांचे मार्गदर्शन लाभले, वडील

सुमित जगताप वयाच्या २४ व्या वर्षी आयपीएस ! तालुक्यातील पहीला आयपीएस अधिकारी होण्याचा मान अन् गांवात दिवाळी साजरी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
            नासिक::- निफाड तालुक्यातील उत्तर-पूर्व पट्ट्यातील सरहद्दीवर असणाऱ्या वावी ठुशी गावचे भूमिपुत्र सुमित कैलास जगताप वय (२४) यांनी   पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत निफाड तालुक्यातील पहिला आयपीएस होण्याचा  मान मिळवत देशात  ५०७ वे  मानांकन मिळविले. तालुक्याबरोबर वावी ठुशी चे नाव  कानाकोपऱ्यात  पोहोचवल्याने तालुक्यात  तसेच गावात दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरी होत असून फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत वावी ठुशीकरांनी आनंदोत्सव साजरा केला,           सुमीत जगताप यांचे प्राथमिक शिक्षण वावी ठुशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत , काकासाहेब नगर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता पाचवीचे तर इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण कळवण-मानूर येथील  शरद पवार पब्लिक स्कूल येथे होऊन इयत्ता अकरावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण नाशिक येथील अशोका कॉलेज येथे घेतले, के के वाघ शिक्षण संस्थेत केमिकल इंजीनियरिंग ची पदवी २०१७ मध्ये घेत यूपीएससीचा अभ्यास पुणे, नाशिक, दिल्ली येथे सुरू करून पहिल्याच प्रयत्नात यशाचा झेंडा रोवला. यूपीएससी परीक्षेत पूर्व मुख्य प

कष्टकरी कुटुंबातील मुलींनी दहावीत मिळवलेल्या यशाचे मान्यवरांकडून कौतुक व सत्कार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक – जिल्हा परिषदेच्या शासकिय कन्या शाळेतील कष्टकरी कुटुंबातील मुलींनी दहावीत मिळवलेल्या यशाचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कौतूक केले. गुणवंत विद्यार्थीनींचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.       जिल्हा परिषदेच्या शासकिय कन्या शाळेत कष्टकरी तसेच शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थीनी शिक्षण घेतात. सन २०१९-२० मध्ये दहावी परिक्षेत बसलेल्या ६९ पैकी ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ८५.५० टक्के लागला आहे. प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थीचे कौतुक करण्यासाठी जिल्हा परिषदेचया मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदेत या विद्यार्थींचा सत्कार करण्यात आला. अश्विनी गांगुर्डे ही विद्यार्थीनी ८८.५० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. ही विद्यार्थीनी सर्वसाधारण कुटुंबांतील असून जातेगाव येथे आत्याच्या घरी राहुन शिक्षण घेत आहे. ८७.०० गुणांसह व्दितीय क्रमांकाने उत्तीण झालेली अनुजा मेढे ही वासाळी गावातील

कांदा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलनाचा उद्रेक होईल. शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील यांचा इशारा. !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी न्यूज मसाला सर्विसेस कांदा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलनाचा उद्रेक होईल.    शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील यांचा इशारा . !!           नासिक::-कोरोना संकटामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, भाजीपाला, मका, सोयाबीन इत्यादी पिकांना प्रसंगी मातीमोल भावात विक्री करावी लागल्याने आधीच कोलमडलेल्या शेतकऱ्यांना आता कांदा दराच्या घसरणीला तोंड द्यावे लागत आहे. कांद्याची अर्धेअर्धास उत्पादन शिल्लक असून ऑक्टोबर महिन्या पर्यंत नवीन कांदा बाजारात  येईल परंतु आज रोजी कांदा दरात प्रचंड घसरण झाली असून यातून मार्ग निघाला नाही तर शेतकरी मोठ्या संकटात सापडेल. केंद्र सरकारने तातडीने निर्यात प्रोत्साहन योजना लागू करून निर्यातीला चालना देण्याची आवश्यकता आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीमा बंदी करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा आज होणारी निर्यात सुद्धा थांबेल. पर्यायांने पुन्हा दरात घसरण होईल यासाठी आताच नियोजन होण्याची आवशकता आहे. मागच्या काळात रेल्वे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या होत्या त्याच प्रकारे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या