धनगर ऐक्य अभियान -- धनगर समाज सरकारला देणार स्वतःच्या रक्ताने लिहून निवेदन - डॉ शशिकांत तरंगे ! १३ आॅगस्ट राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी दिनी देणार निवेदन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य..
धनगर समाज सरकारला देणार स्वतःच्या रक्ताने लिहून निवेदन - डॉ शशिकांत तरंगे
१३ ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक तहसील कार्यालय वरती धनगर समाज बांधव धनगर ऐक्य अभियान मार्फत राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये स्व:ताच्या रक्ताने लिहून निवेदन देणार आहे
    .....निवेदन मधील विषय....
धनगर समाज STआरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करा !
धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करा व 1000 कोटीची तरतूद ताबडतोब करा.
मेंढपाळांना संरक्षण द्या त्याच्यावर होणारे हाल्ले थांबवा.
यासाठी राज्यभरातून आपल्या मागण्यांसाठी धनगर बांधव स्वतःच्या रक्ताने निवेदन लिहून मे. तहसीलदार मार्फत राज्य सरकारला निवेदन देणार आहे, यामध्ये सरकारला पंधरा दिवसाचा वेळही ही दिला जाणार आहे.
अन्यथा पंधरा दिवसानंतर राज्यभर महा विकास आघाडी सरकार विरोधात धनगर समाज अतिशय उग्र आंदोलन घोषित करणार असल्याचे डॉ शशिकांत तरंगे यांनी जाहीर केले...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जलसंपदा विभागाने हिशेब द्यावा, नाशिककरांना ठोस उत्तरे द्यायला हवीत !

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन, अभियानात दुष्काळ निवारणासाठी गावागावांत जलसंधारणाची कामे हाती घ्या–मुख्यमंत्री

वाडिया रुग्णालयामुळे मालेगावकरांना दर्जेदार आरोग्यसेवेची सुविधा ! रुग्णालयासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही :शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे