सुमित जगताप वयाच्या २४ व्या वर्षी आयपीएस ! तालुक्यातील पहीला आयपीएस अधिकारी होण्याचा मान अन् गांवात दिवाळी साजरी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

            नासिक::- निफाड तालुक्यातील उत्तर-पूर्व पट्ट्यातील सरहद्दीवर असणाऱ्या वावी ठुशी गावचे भूमिपुत्र सुमित कैलास जगताप वय (२४) यांनी   पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत निफाड तालुक्यातील पहिला आयपीएस होण्याचा  मान मिळवत देशात  ५०७ वे  मानांकन मिळविले. तालुक्याबरोबर वावी ठुशी चे नाव  कानाकोपऱ्यात  पोहोचवल्याने तालुक्यात  तसेच गावात दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरी होत असून फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत वावी ठुशीकरांनी आनंदोत्सव साजरा केला, 
         सुमीत जगताप यांचे प्राथमिक शिक्षण वावी ठुशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत , काकासाहेब नगर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता पाचवीचे तर इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण कळवण-मानूर येथील  शरद पवार पब्लिक स्कूल येथे होऊन इयत्ता अकरावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण नाशिक येथील अशोका कॉलेज येथे घेतले, के के वाघ शिक्षण संस्थेत केमिकल इंजीनियरिंग ची पदवी २०१७ मध्ये घेत यूपीएससीचा अभ्यास पुणे, नाशिक, दिल्ली येथे सुरू करून पहिल्याच प्रयत्नात यशाचा झेंडा रोवला. यूपीएससी परीक्षेत पूर्व मुख्य परीक्षा व २८ जुलैला दिल्ली येथील मुलाखातीत प्रखर आत्मविश्वासाच्या बळावर उत्तीर्ण होत सुप्रीडेटेडं  ऑफ पोलीस अर्थात एसपी  पदावर आपली निवड करत सुमित जगताप यांनी आपल्या वडिलांचे स्वप्न आयएसआय होण्याची इच्छा पूर्ण केली.  सुमित जगताप यांचे वडील चांदवड येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत तर आई ही गृहिणी असून, वावी ठुशी येथील शेतावर शेतीची जबाबदारी संभाळून सुमीत यांच्या पेक्षा लहान भावाला व बहीणीची व घराची जबाबदारी सांभाळतात, सुमीतच्या यशाने भारावून नाशिक पोलीस ग्रामीण अधीक्षक आरती सिंग यांनी त्यांच्या आई-वडिलांसह कार्यालयात बोलावून नाशिक ग्रामीण पोलीस च्या वतीने सत्कार व अभिनंदन केले. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉक्टर भारती पवार , निफाडचे आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल पाटील कदम, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णाताई जगताप, नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे, निफाडच्या प्रांत अधिकारी डॉक्टर अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील, संतोष गिरी आदींनी भ्रमणध्वनीद्वारे सुमित जगताप यांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
________________________________________
सुमित जगताप नवनियुक्त आय. पी . एस.
निफाड तालुक्यातील पहिला आय. पी.एस. होण्याचा मान मला पटकावता आल्याने खूपच आनंद झाला आहे. तालुक्यातील सर्वप्रथम एमपीएससी परीक्षेत सारोळे खुर्द येथील जनार्दन कासार यांनी निफाड तालुक्यातून  उपजिल्हाधिकारी होण्याचा मान मिळवला व आता आयपीएस  होण्याचा मान मी प्राप्त केल्याने तालुक्यातील हे स्वप्न एका प्रकारे पूर्ण झाले, वडिलांनी बघितलेले आयपीएस होण्याची इच्छा मला पूर्ण करता आली, वडिलांच्या ऑफिसला गेल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सॅल्यूट मारताना बघितल्या नंतर आपणही एक आयपीएस अधिकारी व्हावे व आपल्यालाही कुणीतरी सॅल्यूट मारावा ही मनोमन इच्छा होती त्यात वडिलांनी कायम मार्गदर्शन केल्याने आजचे हे यश मी बघू शकलो, या यशात  माझ्या आई-वडिलांचा,  गुरुजनांचा , व मार्गदर्शक यांचा खूप मोठा वाटा आहे.
संतोष गिरी यांजकडून,
न्यूज मसाला सर्विसेस,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!