शेतकरी कुटुंबातील कांचन बनली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


शेतकरी कुटुंबातील कांचन बनली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ! 
नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (तांत्रिक) परीक्षा चा निकाल जाहीर झाला असून  निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील  कांचन शंकर आवारे हिने सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
          कांचन ही शेतकरी व सर्वसामान्य घरातील मुलगी असून तिचे शालेय शिक्षण चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये व त्यांनतर मेकॅनिकल डिप्लोमा हा चांदोरी येथील कर्मवीर काकासाहेब वाघ आभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केला, पदवी शिक्षण नाशिक येथील गोखले  महाविद्यालयात पूर्ण केले, कांचन ने  पदवी महाविद्यालयात प्रवेश घेतल्या बरोबरच स्पर्धा परीक्षा चा अभ्यास सुरू केला. महाविद्यालयातील अभ्यासिका व घरी अभ्यास करीत २०१७ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. काही  कारणास्तव त्याचा निकाल जाहीर होण्यास विलंब झाला होता. मोठ्या प्रतिक्षेनंतर निकाल जाहीर झाला व त्यात कांचनने यशाला गवसणी घातल्याचे घोषित झाले, यांत अरुण नागरे ,महेंद्र धनाईत ,अमोल टाके यांचे मार्गदर्शन लाभले, वडील शंकर आवारे हे शेतकरी व आई गृहिणी व शेती काम करतात. कांचन ने मिळवलेल्या यशा बद्दल तिचे निफाडचे आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे,  लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा ताई जगताप आदीसह‌ ,  निफाड प्रांताधिकारी डॉ अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील,  गटविकास अधिकारी संदीप कराड आदी सह खेरवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
****************************************
          माझे आई - वडील दोघे  शेतकरी  आहे, नेहमी मनात अधिकारी होण्याचे स्वप्न होते, तसेच नेहमी लोकपयोगी कामे करता येईल व त्यातून आदर मिळेल अशी नोकरी असावी असे नेहमी वाटत होते आज ते स्वप्न पूर्ण झाल्याने आनंद वाटत आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास  करणाऱ्या युवक -युवतींनी अभ्यासात सातत्य ठेवावे व आपल्या प्रयत्नावर विश्वास ठेऊन अभ्यास करत रहावे.
--कांचन आवारे ( सहायक मोटार वाहन निरीक्षक)
*****************************************
                                  संतोष गिरी यांजकडून
                                  न्यूज मसाला सर्विसेस
                                  नासिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !