कांदा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलनाचा उद्रेक होईल. शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील यांचा इशारा. !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

संतोष गिरी
न्यूज मसाला सर्विसेस
कांदा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलनाचा उद्रेक होईल.
   शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील यांचा इशारा. !!
          नासिक::-कोरोना संकटामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, भाजीपाला, मका, सोयाबीन इत्यादी पिकांना प्रसंगी मातीमोल भावात विक्री करावी लागल्याने आधीच कोलमडलेल्या शेतकऱ्यांना आता कांदा दराच्या घसरणीला तोंड द्यावे लागत आहे. कांद्याची अर्धेअर्धास उत्पादन शिल्लक असून ऑक्टोबर महिन्या पर्यंत नवीन कांदा बाजारात  येईल परंतु आज रोजी कांदा दरात प्रचंड घसरण झाली असून यातून मार्ग निघाला नाही तर शेतकरी मोठ्या संकटात सापडेल. केंद्र सरकारने तातडीने निर्यात प्रोत्साहन योजना लागू करून निर्यातीला चालना देण्याची आवश्यकता आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीमा बंदी करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा आज होणारी निर्यात सुद्धा थांबेल. पर्यायांने पुन्हा दरात घसरण होईल यासाठी आताच नियोजन होण्याची आवशकता आहे. मागच्या काळात रेल्वे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या होत्या त्याच प्रकारे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या तर निर्यात थांबणार नाही, यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे, युरोपात संधी असल्याने विशेष प्रयत्न करून युरोपियन देशांमध्ये निर्यातीसाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे, नाफेड कडून मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट कांदा साठवण करण्यात आली असल्याने देशांतर्गत बाजारपेठेवर विसंबून न राहता निर्यातीसाठी चालना देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय मध्यप्रदेशच्या धर्तीवर भावांतर योजना लागू करून उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव शेतकऱ्यांना द्यावा ही वजावटीची रक्कम सरकारने निधीची तरतूद  करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात  जमा करावी बाजारभाव सुरळीत होत नाही तोपर्यंत भावांतर योजना राबविण्यात यावी आणि शेतकरी वाचवावा अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील यांनी केली आहे.सरकारने तातडीने पाऊले उचलली नाहीत तर आंदोलनाचा उद्रेक होईल असा इशारा दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक