वै.हभप प्रभाकर पाटील एक अजातशत्रु व्यक्तीमत्व - आण्णासाहेब आहेर हिसवळकर ! ------------------------------------- नासिक(श्रमिकनगर) ::- मनात विचार, वाणीत उच्चार, व कृतीत आचाराचं समत्व हे काही महाभागांच्या जीवनाचा पाया व तोच परमार्थाचा कळस ठरत असतो, असा प्रवास देवत्व प्राप्त करतो, हभप वै. प्रभाकर पाटील हे संत विचाराचे पाईक होते. प्रवृत्ती धर्मातुन निवृत्ती धर्माकडे प्रवास करतांना त्यांनी पुन्हा कधी मागे वळुन पाहिलेच नाही, साधारणत: कोणतेही शास्र विरुध्द आचरण याला पाप म्हणतात, हे शास्रविरुध्द आचरण परमेश्वर प्राप्तीला प्रतिबंधक होते, असे शास्र आहे. पाप हे तीन प्रकारचे आहे, भगवंताला विसरणे हे अविद्यारुप मुख्य पाप, त्यामुळे देहात्मवादी होणे दुसरे पाप, "बळे देह मी म्हणता! कोटी ब्रम्हहत्या माथा!!" व भगवंताच्या आज्ञेच्या विरुध्द वागणे हे तिसरे पाप. त्यांनी मात्र यापलीकडे वाटचाल केली होती. बाह्य जगात ही वैर नव्हते व अंतर शत्रु ही शांत करुन एक परमात्माच आपलासा केलेला पवित्र देह रुपी जीवन म्हणजे वै. प्रभाकर पाटील होय, त्यांना जीवनात कोणीच