छत्रपती संभाजी राजे यांची दरीआईमाता देवस्थानला सदिच्छा भेट ! येथील वनौषधींचा खजिना टिकवून ठेवण्यासाठी वनविभागाने लक्ष द्यावं !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!


दरी :- दि.३ जानेवारी २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज खासदार युवराज छत्रपती  संभाजी राजे यांची दरी गावातील  ग्रामदैवत असलेल्या दरीआईमाता देवस्थानला सदिच्छा भेट दिली
           कोल्हापूर संस्थानचे युवराज छत्रपती संभाजी राजे यांचा गेल्या काही वर्षापासून दरीआई मातेच्या दर्शनाचा मानस होता तो नुकताच पूर्ण झाला, कोरोनाच्या काळात सर्व ठिकाणचे पर्यटनस्थळे बंद असताना एकमेव असे हे स्थळ खुले असल्याने याबाबत पर्यटनाचा मोठा गाजावाजा झाला. या काळात दरीआई माता परिसर विलोभनीय असा ठरला होता, त्यामुळे पर्यटनाचा हा मोठा मानबिंदू ठरू शकतो हा उद्देश समोर ठेऊन स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी येथे मोठी झाडे लावण्यास सुरवात केली असल्याने या परिसरात येण्याचा मोह कोणालाही आवरता येत नाही, त्यामुळे या पर्यटन स्थळाच्या संगोपनासाठी युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी देखील भेट देत गडकिल्ले संवर्धन या कार्यक्रमातून तसेच स्वतः लागेल ती मदत या साठी करण्यास सदैव तयार आहोत असे आश्वासन गावातील जनतेस दिले, तसेच पर्यावरणाचा समतोल टिकविण्यासाठी वृक्ष लागवड करा येथील आयुर्वेदिक व वनौषधी चा खजिना टिकून ठेवण्यास सामाजिक वन विभागास सहकार्य करण्याबाबत सांगितले. 
                 या वेळी राजेंच्या व मान्यवरांच्या हस्ते दरी आई माता मंडळाकडून नुकतेच प्रथम वर्ष कालदर्शिका तयार करण्यात आली असून या कालदर्शिकेचे अनावरण करण्यात आले, यावेळी दरीआईमाता देवस्थान परिसर सुधारण्यासाठी आयुष्य झोकून देणारे भारत पिंगळे ,सचिन पिंगळे, शिवाजी धोंडगे, तुषार पिंगळे यांचा सत्कार राजेंच्या हस्ते करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा. पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

महिला शिक्षणाधिकारी व लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

पोलिस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !