जिल्हा परिषद प्रशासनाकडून ८ रोजी कोरोना लसीकरण मोहिमेचा ड्राय रन घेण्यात आला ! २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे प्रात्यक्षित व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडून प्रक्रीयेचा आढावा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!


सय्यद पिंप्री येथे कोरोना लसीची ड्राय रन संपन्न

२५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे करण्यात आले प्रात्यक्षित

नाशिक -  कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे बहुप्रतीक्षित कोविड-१९ प्रतिबंधक लस ही नेमकी कधी दिली जाणार याबद्दल उत्सुकता असतांना जिल्हा प्रशासनाकडून दिनांक ८ रोजी कोरोना लसीकरण मोहिमेचा ड्राय रन घेण्यात आला,  यामध्ये हे लसीकरण कशाप्रकारे पार पाडले जाणार याची रंगीत तालीम करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सय्यद पिंपरी येथे उपस्थित राहून घेतला.कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये तीन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, पहिल्या कक्षात आलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यात येईल त्यानंतर दुसऱ्या कक्षात लसीकरण करण्यात येईल, लसीकरण झाल्यानंतर तिसऱ्या कक्षात लसीकरण झालेल्या व्यक्तीला ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेऊन त्यानंतरच सोडण्यात येईल. यावेळी एखाद्या व्यक्तीस प्राथमिक उपकेंद्रातून जिल्हा रुग्णालयात हलवण्याची वेळ आल्यास १०८ रुग्णवाहिकेची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ रविंद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दावल साळवे, अतिरिक्त गट विकास अधिकारी विनोद मेढे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ कैलास भोये, डॉ माधव अहिरे आरोग्य अधिकारी, डॉ परशुराम किरवले आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक डॉ जयश्री नटेश, आरोग्य अधिकारी  डॉ जयश्री पाटील यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!