कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे व किटकनाशके पुरवावी- सुनिल बोरकर, गुण नियंत्रण संचालक, कृषी आयुक्तालय.
कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे व किटकनाशके पुरवावी- सुनिल बोरकर, गुण नियंत्रण संचालक, कृषी आयुक्तालय. नाशिक : जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांची खरिप हंगाम पूर्व प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करताना सुनिल बोरकर यांनी बियाणे, खते आणि किटकनाशके यांची विक्री करताना ऑनलाईन प्रक्रिया आत्मसात करुन कायद्यातील तरतुदींप्रमाणे कृषी निविष्ठांचे उत्पादन व विक्री करावी. जेणेकरुन शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे कृषी उत्पादन घेता येईल. याबाबत बोलताना, त्यांनी बियाणे विक्रीसाठी बनविलेल्या ‘साथी’ या पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन केले. बियाण्याचे उत्पादन ते विक्रीपर्यंत संपूर्ण माहिती मिळू शकते. आणि शेतकऱ्याला दर्जेदार बियाणे पुरवठा शक्य होतो. तसेच रासायनिक खतांची विक्री करताना ई-पॉस प्रणालीचा वापर करावा. तसेच ई-पॉस ऑनलाईन साठा आणि गोदामातील प्रत्यक्ष उपलब्ध खतसाठा याची दररोज पडताळणी करावी. केंद्र शासनाच्या धोरणानुसार ई-पॉस वरील खत शासनाच्या माहिती आधारेच खतांचे जिल्ह्यात वितरण केले जाते. त...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा