वै. हभप प्रभाकर पाटील एक अजातशत्रु व्यक्तीमत्व - आण्णासाहेब आहेर हिसवळकर ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!


वै.हभप प्रभाकर पाटील एक अजातशत्रु व्यक्तीमत्व - आण्णासाहेब आहेर
हिसवळकर !                        -------------------------------------   
                        नासिक(श्रमिकनगर) ::- मनात विचार, वाणीत उच्चार, व कृतीत आचाराचं समत्व हे काही महाभागांच्या जीवनाचा पाया व तोच परमार्थाचा कळस ठरत असतो, असा प्रवास देवत्व प्राप्त करतो, हभप वै. प्रभाकर पाटील हे संत विचाराचे पाईक होते. प्रवृत्ती धर्मातुन निवृत्ती धर्माकडे प्रवास करतांना त्यांनी पुन्हा कधी मागे वळुन पाहिलेच नाही, साधारणत: कोणतेही शास्र विरुध्द आचरण याला पाप म्हणतात, हे शास्रविरुध्द आचरण परमेश्वर प्राप्तीला प्रतिबंधक होते, असे शास्र आहे. पाप हे तीन प्रकारचे आहे, भगवंताला विसरणे हे अविद्यारुप मुख्य पाप, त्यामुळे देहात्मवादी होणे दुसरे पाप, "बळे देह मी म्हणता! कोटी ब्रम्हहत्या माथा!!" व भगवंताच्या आज्ञेच्या विरुध्द वागणे हे तिसरे पाप. त्यांनी मात्र  यापलीकडे वाटचाल केली होती. बाह्य जगात ही वैर नव्हते व अंतर शत्रु ही शांत करुन एक परमात्माच आपलासा केलेला पवित्र देह रुपी जीवन म्हणजे वै. प्रभाकर पाटील होय, त्यांना जीवनात कोणीच शत्रु नव्हते, व मित्रही फार थोडे, अर्थात ते अजात शत्रु होते, असे विचार वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी श्रमिकनगर येथे प्रवचन प्रसंगी व्यक्त केले, ते वै.प्रभाकर पाटील यांचे  आठवे पुण्य स्मरणा निमित्त प्रवचन पुष्प गुंफतांना बोलत होते. मृत्युच भान, प्रेमाची जाण, देवाला प्राण, संताला मान, मानवाला ज्ञान, यालाच संत जीवन म्हणतात आणि हे सर्व गुण हभप वै. पाटील यांचे कडे ओतप्रोत भरलेले होते. ते गेले, पण स्मृती म्हणजे निवृत्ती वेतन पाठीमागे ठेऊन गेले, आपले पत्नीचे निर्वाह चिंता सोडऊन गेले असेही आहेर शेवटी म्हणाले. यावेळी गीतेचा पंधरावा अध्यायाच पारायण करण्यात आले, दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरवात झाली. कार्यक्रमास चौधरी, हभपश्री शरद जाधव, हभपश्री. ईघे नाना, हभपसौ. लक्ष्मीताई बोराडे, हभप पुष्पाताई खांडगे,  सौ.अडसरे व परिसरातील भाविक, वारकरी उपस्थीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

प्रशासन की ताकद !! बिगर मंत्री मंडल की सहायता के भी प्रदेश का शासन सफलतापूर्वक चलाया जा सकता है । प्रशासन को भी उन्होंने यह स्पष्ट संदेश दिया है कि मंत्रियों के बीच विभागों के बंटवारे के न हो पाने के बावजूद मुख्यमंत्री पूरे प्रदेश को ‘‘नौकरशाही‘‘ के माध्यम से आवश्यक कार्य निष्पादित (एग्जीक्यूट) कर संदेश देने में सक्षम हैं।