पोस्ट्स

आधुनिक संजीवनी दाखल ! कथा, व्यंगचित्रांचा समसमा संयोग आनंददायी !! ग्रामपालिकेच्या नवनिर्वाचित सर्व सदस्यांनी एकदिलाने काम करावे हीच ग्रामस्थांची इच्छा !!! व इतर सर्व सविस्तर बातम्यांसह आजचा अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आजचा न्यूज मसालाचा अंक !

वै. हभप प्रभाकर पाटील एक अजातशत्रु व्यक्तीमत्व - आण्णासाहेब आहेर हिसवळकर ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
वै.हभप प्रभाकर पाटील एक अजातशत्रु व्यक्तीमत्व - आण्णासाहेब आहेर हिसवळकर !                        -------------------------------------                            नासिक(श्रमिकनगर) ::- मनात विचार, वाणीत उच्चार, व कृतीत आचाराचं समत्व हे काही महाभागांच्या जीवनाचा पाया व तोच परमार्थाचा कळस ठरत असतो, असा प्रवास देवत्व प्राप्त करतो, हभप वै. प्रभाकर पाटील हे संत विचाराचे पाईक होते. प्रवृत्ती धर्मातुन निवृत्ती धर्माकडे प्रवास करतांना त्यांनी पुन्हा कधी मागे वळुन पाहिलेच नाही, साधारणत: कोणतेही शास्र विरुध्द आचरण याला पाप म्हणतात, हे शास्रविरुध्द आचरण परमेश्वर प्राप्तीला प्रतिबंधक होते, असे शास्र आहे. पाप हे तीन प्रकारचे आहे, भगवंताला विसरणे हे अविद्यारुप मुख्य पाप, त्यामुळे देहात्मवादी होणे दुसरे पाप, "बळे देह मी म्हणता! कोटी ब्रम्हहत्या माथा!!" व भगवंताच्या आज्ञेच्या विरुध्द वागणे हे तिसरे पाप. त्यांनी मात्र  यापलीकडे वाटचाल केली होती. बाह्य जगात ही वैर नव्हते व अंतर शत्रु ही शांत करुन एक परमात्माच आपलासा केलेला पवित्र देह रुपी जीवन म्हणजे वै. प्रभाकर पाटील होय, त्यांना जीवनात कोणीच

बाबा एक महान विभूती !  ब्रह्माकुमारी संस्थेचे संस्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त !! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
बाबा एक महान विभूती  ब्रह्माकुमारी संस्थेचे संस्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त ! : जगात तेच लोक महान आणि पूज्य बनतात जे  दुसऱ्याच्या कल्याणासाठी जगतात. अशा महान विभूति चिर काळासाठी अमर होतात.  या महा पुरुषांचे स्मरणतूनच अनेकांना सामर्थ्य प्राप्त होते.  प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय  विश्व विद्यालय चे साकार संस्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबांचे जीवन अशाच महान विभूतींपैकी एक आहे.  त्यांनी अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आपले तन मन धन जीवन संपूर्ण समर्पित केले होते.  बाबांना नेहमी वाटे की एक असा समाज  बनवा जेथे गुन्हे पापाचार, अत्याचार, व्यभिचार, तीलमात्र नसावा.  याच मजबूत मन्सूब्याने ब्रह्माबाबा यांनी ईश्वरीय निर्णया नुसार १९३६ च्या काळात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाची  मुहूर्तमेढ केली.  त्या काळात माता कन्यांना समाजात दुय्यम स्थान होते.  अशा परिस्थितीत मूल्यनिष्ठ समाज निर्मितीच्या कार्यात त्यांनी महिलांना फक्त सहभागी करून घेतले नाही तर संस्थेची धुरा अशा महिलांच्याच हाती दिली.  महिलांना ज्या काळात नरकाचे द्वार सर्पिणी अशा शब्दांनी हिणवले जात त्

विकास कामांची प्रत्यक्ष पहाणी करत लाभार्थ्यांशी साधला संवाद ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांची कळवण तालुक्यास भेट विकास कामांची प्रत्यक्ष पहाणी करत लाभार्थ्यांशी साधला संवाद                  कळवण - नासिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी आज (१२) रोजी कळवण तालुक्यास भेट दिली. यामध्ये विविध शासकीय योजनांचा आढावा घेत लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन कामाचा दर्जा गुणवत्ता आणि सदरील योजनांचा लाभार्थ्यांना झालेला फायदा याबद्दल माहिती घेतली. कृषी विशेष घटक योजना लाभधारक अण्णा हिरामण शिंदे यांना २०१९ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहीर बांधून देण्यात आली होती, या विहिरीच्या पाण्यावर त्यांनी २ एकर कांदा लागवड केली असुन त्यांच्या एकुण उत्पन्नात वाढ झाली असल्याचे यावेळी उपस्थित अधिका-यांना सांगितले. बायोगैस संयत्राचे लाभार्थी मिलिंद कारभारी वाघ यांच्या घरी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी भेट देत माझी वसुंधरा योजनेची माहिती देऊन  बायोगैस संयत्राचा वापर करणा-या वाघ कुटुंबीयांचे कौतुक केले. कळवण पंचायत समिती कृषी विभागाने विविध योजनांचा लाभ ह

छत्रपती संभाजी राजे यांची दरीआईमाता देवस्थानला सदिच्छा भेट ! येथील वनौषधींचा खजिना टिकवून ठेवण्यासाठी वनविभागाने लक्ष द्यावं !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!

इमेज
दरी :- दि.३ जानेवारी २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज खासदार युवराज छत्रपती  संभाजी राजे यांची दरी गावातील  ग्रामदैवत असलेल्या दरीआईमाता देवस्थानला सदिच्छा भेट दिली            कोल्हापूर संस्थानचे युवराज छत्रपती संभाजी राजे यांचा गेल्या काही वर्षापासून दरीआई मातेच्या दर्शनाचा मानस होता तो नुकताच पूर्ण झाला, कोरोनाच्या काळात सर्व ठिकाणचे पर्यटनस्थळे बंद असताना एकमेव असे हे स्थळ खुले असल्याने याबाबत पर्यटनाचा मोठा गाजावाजा झाला. या काळात दरीआई माता परिसर विलोभनीय असा ठरला होता, त्यामुळे पर्यटनाचा हा मोठा मानबिंदू ठरू शकतो हा उद्देश समोर ठेऊन स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी येथे मोठी झाडे लावण्यास सुरवात केली असल्याने या परिसरात येण्याचा मोह कोणालाही आवरता येत नाही, त्यामुळे या पर्यटन स्थळाच्या संगोपनासाठी युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी देखील भेट देत गडकिल्ले संवर्धन या कार्यक्रमातून तसेच स्वतः लागेल ती मदत या साठी करण्यास सदैव तयार आहोत असे आश्वासन गावातील जनतेस दिले, तसेच पर्यावरणाचा समतोल टिकविण्यासाठी वृक्ष लागवड करा येथील आयुर्वेदिक व वनौषधी चा खजिना टिकून ठेवण्यास

जिल्हा परिषद प्रशासनाकडून ८ रोजी कोरोना लसीकरण मोहिमेचा ड्राय रन घेण्यात आला ! २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे प्रात्यक्षित व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडून प्रक्रीयेचा आढावा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!

इमेज
सय्यद पिंप्री येथे कोरोना लसीची ड्राय रन संपन्न २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे करण्यात आले प्रात्यक्षित नाशिक -  कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे बहुप्रतीक्षित कोविड-१९ प्रतिबंधक लस ही नेमकी कधी दिली जाणार याबद्दल उत्सुकता असतांना जिल्हा प्रशासनाकडून दिनांक ८ रोजी कोरोना लसीकरण मोहिमेचा ड्राय रन घेण्यात आला,  यामध्ये हे लसीकरण कशाप्रकारे पार पाडले जाणार याची रंगीत तालीम करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सय्यद पिंपरी येथे उपस्थित राहून घेतला.कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये तीन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, पहिल्या कक्षात आलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यात येईल त्यानंतर दुसऱ्या कक्षात लसीकरण करण्यात येईल, लसीकरण झाल्यानंतर तिसऱ्या कक्षात लसीकरण झालेल्या व्यक्तीला ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेऊन त्यानंतरच सोडण्यात येईल. यावेळी एखाद्या व्यक्तीस प्राथमिक उपकेंद्रातून जिल्हा रुग्णालयात हलवण्याची वेळ आल्यास १०८ रुग्णवाहिकेची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी जिल्ह

ट्रक्टर व ट्राॅली या वाहनांचा व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीमध्ये टाकण्यास विरोध ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
ट्रक्टर व ट्राॅली या वाहनांचा व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीमध्ये टाकण्यास विरोध ! नासिक::- केंद्रीय मार्ग व राज्यमार्गाची अधिसूचनेच्या ड्राफ्टमध्ये ट्रक्टर व ट्राॅली या वाहनांना गैरव्यावसायिक वाहन श्रेणीतून बाहेर करण्यात येणार असल्याचे निदर्शनास आले याचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रतन चावला यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.        ट्रक्टर व ट्राॅलीला सडक परीवहन विभाग किंवा एन एच ए आय च्या नियमावलीत संशोधन करून ट्रक्टर व ट्राॅलीला व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीत आणले तर टोल संकलन केंद्रावर यापुढे ट्रक्टर व ट्राॅलीला टोल भरावा लागेल यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागेल तथापी राज्यात तथा देशात पुन्हा मोठे शेतकरी आंदोलन उभे राहिल. यावर समर्पक निर्णय घेण्यात यावा अशा आशयाचे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष येथे आज देण्यात आले.