सन्मित्र प्रा. डॉ. सुनील देवधर व शाळासोबती प्रदीप मुळे ! एकाच दिवशी दोघांवर कोरोनाचा आघात !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
सन्मित्र हरपला... प्रतिभावान कवी, उत्स्फूर्त विडंबनकार, विद्यार्थिप्रिय प्राध्यापक, तळमळीचा कार्यकर्ता, आदर्श पती, प्रेमळ पिता अशी विविध रूपे एका व्यक्तीत एकवटलेली दिसणे विरळाच म्हणावे लागेल. प्रा.डॉ. सुनील देवधर हे अशांपैकी एक होते. कोरोनाच्या विळख्यात ते अडकले व अवघ्या तीन दिवसात काळाने आमच्या या सन्मित्राला हिरावून नेले. शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान होते. केवळ उक्तीपेक्षा त्यांच्या कृतीतूनच ते अधिक असायचे व दिसायचे. नाशिकरोडच्या बिटको महाविद्यालयात प्रा.डॉ. देवधर यांनी ३६ वर्षे अध्यापन केले. ते अकौंटन्सी विभाग प्रमुख म्हणून जानेवारी महिन्यात निवृत्त झाले. महाविद्यालयात त्यांनी एन.सी.सी.च्या एअर विंगचे प्रमुख म्हणूनही काम केले. छात्रसेनेचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. हरहुन्नरी स्वभाव असल्याने ते जणु जगन्मित्रच झालेले होते. त्यांनी खूप मोठा मित्रपरिवार जमवला होता.शैक्षणिक क्षेत्राप्रमाणेच सामाजिक उपक्रमांमध्येही ते हिरिरीने सहभागी होत.गोदाघाट स्वच्छता म