Xxxxxx locked his profile ! स्वत:चे ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचे पहायचे वाकून !! सुप्रसिद्ध लेखक नागेश शेवाळकर यांनी थोडक्यात घेतलेला समाचार वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
कुलूप बंद परिचय! सकाळी सकाळी नेहमीच्या सवयीप्रमाणे मी फेसबुक सुरु केले. पाहतो तर काय तब्बल एकवीस मैत्रीच्या विनंत्या येऊन पडल्या होत्या. मनोमन खूप खुश झालो कारण कुणीतरी आपणहून माझ्याशी मैत्री करु पाहत आहे ही अभिमानाची गोष्ट होती. आपण आता विख्यात, प्रसिद्ध असे काही तरी मोठे झालो आहोत या समाधानात मी एका- एका विनंतीदाराचे खाते उघडत गेलो. तसतसा माझा चेहरा पडत गेल्याचे मलाच जाणवले.. कारण एकवीस पैकी वीस जणांनी आपला परिचय कुलूपबंद केला होता. एकविसावी व्यक्ती अनोळखी महिला होती. तिचा परिचय होता परंतु एका अनोळखी महिला आपल्या पतीची मैत्रीण आहे हे समजताच कुटुंबात संशयकल्लोळ व्हायला नको म्हणून मी ती मैत्री स्वीकारली नाही... आजकाल फेसबुकवर एक नवीन कृती दिसून येत आहे... अनेक वर्षांनंतर शालेय जीवनातील एखाद्या मित्राची फेसबुकवर 'मैत्रीची विनंती' येते. आपण मोठ्या उत्साहाने ती मैत्री स्वीकारण्यापूर्वी हा आपला मित्र काय करत आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचे फेसबुक खाते उघडतो किंवा 'मित्राचा मित्र तो आपला मित्र' अशा धाग्यातून एखाद्या मित्राच्या मित्राची मैत्रीची विनंत