पोस्ट्स

निरामय वैश्विक स्वास्थ्यासाठी आयुर्वेद उपयुक्त - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत न्यूज मसाला सर्विसेस, नासिक, 7387333801.

इमेज
निरामय वैश्विक स्वास्थ्यासाठी आयुर्वेद उपयुक्त - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत     निरामय स्वास्थ ही संकल्पना आयुर्वेदाने फार पूर्वीपासून मांडली. आता आयुर्वेद उपचार पद्धत वैश्विक ठरू लागली आहे. केवळ 'इलनेस' दूर करणे नव्हे; तर 'वेलनेस' टिकवून ठेवणे हा आयुर्वेदाचा मूळ पाया आहे. सारे जग त्याच्याकडे आशेने बघते आहे. आयुर्वेदाने इतर पॅथींना एकत्र जोडून समन्वयाची भूमिका पेलावी. 'आयुर्वेद व्यासपीठ ' च्या माध्यमातून अग्रेसर राहून निरामय विश्वासाठी आयुर्वेद चिकित्सा रुग्णांपर्यंत पोहोचली पाहिजे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी या आशयाचे प्रतिपादन केले.     नाशिकमध्ये  बुधवारी ( दि.१४ जुलै )आयुर्वेद व्यासपीठच्या  'चरक सदन' या वास्तूचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. ऑनलाईन पद्धतीने कळ दाबून उद्घाटन करण्यात आले. मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत गंगापूर रोडवरील डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य संकुलातील सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी अध्यक्षस्थानी भारतीय चिकित्सा पध्दती आयोगाचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी होते. त्यांच्या सम

औषध निर्माण अधिकारी संघटनेमार्फत शासकीय कन्या विद्यालय येथे मोफत वह्या वाटप ! एक वही मोलाची, सावित्रिच्या लेकीची !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
औषध निर्माण अधिकारी संघटनेमार्फत शासकीय कन्या विद्यालय येथे मोफत वह्या वाटप !      नासिक( प्रतिनिधी)::-सामाजिक बांधिलकी उपक्रमातून महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी  संघटना, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा, नाशिक व विविध सेवाभावी संस्था यांचे वतीने नाशिक शहरातील जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या शासकीय कन्या विद्यालय नाशिक या शतक महोत्सव पूर्ण केलेल्या ऐतिहासिक शाळेतील इयत्ता १ली ते १० वीच्या सर्वसाधारणपणे  ६०० मुलींसाठी  " एक वही मोलाची सावित्रीच्या लेकीची" हे ब्रिद घेऊन विविध प्रकारच्या ६४०६ वह्या मोफत वाटप करण्यात आल्या.      कोरोना काळात नाशिक शहरातील गरीब कुटुंबातील मुली या शिक्षणापासून वंचित राहू नये व त्यांना मोफत शिक्षण उपलब्ध होत असतांना अत्यावश्यक वह्या उपलब्ध होण्यासाठी औषध निर्माण अधिकारी संघटना व विविध सेवाभावी संस्था मागील गत आठ वर्षांपासून सातत्याने मोफत शालोपयोगी वह्या शासकीय कन्या शाळेतीलमुलींसाठी मोफत उपलब्ध करुन देत आहे. शासकीय कन्या विद्यालय नाशिक येथील मुलींना मोफत शालेय अभ्यासक्रमास आवश्यक वह्या उपलब्ध करुन देणेकामी प्रसिद्ध उद्योजक प्रदीप राठी, सामाजिक क

" अल्फ़ाज़ो की उड़ान " प्रातिनिधिक कथासंग्रहाचे लवकरच प्रकाशन! नागेश शेवाळकर यांच्या दोन कथांचा समावेश! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
" अल्फ़ाज़ो की उड़ान " प्रातिनिधिक कथासंग्रहाचे लवकरच प्रकाशन! नागेश शेवाळकर यांच्या दोन कथांचा समावेश!!        पुणे (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील ख्यातकीर्त लेखक नागेश सू. शेवाळकर यांच्या दोन हिंदी कथांचा समावेश असणारा 'अल्फ़ाज़ो की उड़ान' हा कथासंग्रह २६ जुलै २०२१ रोजी उज्जैन (मध्यप्रदेश) येथे प्रकाशित होत आहे. जतिन गहलोत प्रकाशक यांनी श्रीहिन्द पब्लिकेशनव्दारे हा प्रातिनिधिक हिंदी कथासंग्रह प्रकाशनार्थ सज्ज केला आहे.          महाराष्ट्रातील नामवंत लेखक नागेश सू. शेवाळकर यांनी लिहिलेल्या 'चाय पुराण' आणि 'डर कोरोना का' या दोन हिंदी विनोदी कथांचा ह्या कथासंग्रहात समावेश करण्यात आला आहे. मराठी भाषेत लेखन करणाऱ्या शेवाळकरांनी हिंदी भाषेत लेखनाचा असा शुभारंभ केला असून या यशाबद्दल नागेश शेवाळकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हा कथासंग्रह, अमेझॉन, किंडले अशा संस्थांवर विक्रीसाठी उपलब्ध असेल असे जतिन गहलोत यांनी कळवले आहे.

जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावुन निदर्शने ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
   जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावुन निदर्शने !        नाशिक- केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचारी धोरणाविरोधात जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध मागण्याकरीता पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना  अप्पर  जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे आणि अति.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांचे मार्फत जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अरुण आहेर, कार्याध्यक्ष डॉ.भगवान पाटील, सरचिटणीस महेंद्र पवार, प्रमोद निरगुडे , सचिन विंचुरकर यांनी निवेदन दिले. राज्य सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक – शिक्षकेत्तर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि कंत्राटी व अंशकालिन कर्मचारी यांचे मागण्यांबाबत गेल्या दोन वर्षापासुन वारंवार निवेदने, निदर्शने, आंदोलने करूनही केंद्र व राज्य  शासनाने दखल न घेतल्याने कर्मचा-यांच्या मनात तिव्र आक्रोश आहे. कोरोना महामारीच्या राष्टीय आपत्ती निवारण कार्यात जिल्हा परिषदेचे सर्व विभागातील कर्मचारी यांनी जिव धोक्यात घालुन फ्रन्ट लाईन वर्कर म्हणुन सामाजिक बांधिलकीने कर्तव्य बजावतांना कर्मचा-यांचे मोठया प्रमाणावर

साप्ताहिक न्यूज मसाला दि. १५ जुलै चा अंक. सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
सा प्ताहिक न्यूज मसाला दि. १५ जुलै चा अंक न्यूज  मसाला दि. १५ जुलै चा अंक

मर्मज्ञ चित्रकार ; उपक्रमशील पत्रकार संजयजी देवधर ! मुक्त पत्रकार पराग वाड यांनी संजयजी यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या लेखनीतून शब्दबद्ध केलेल्या शुभेच्छा !! न्यूज मसाला परीवाराकडून संजयजी यांना ६३ व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस , नासिक    7387333801 मर्मज्ञ चित्रकार ; उपक्रमशील पत्रकार    अतिशय साक्षेपी दृष्टी लाभलेले प्रतिभावंत चित्रकार, कलासमीक्षक, वारली चित्रशैलीचे अभ्यासक, दैनिकात दीर्घकाळ वार्ताहर तसंच उपसंपादक आणि सेवानिवृत्तीनंतर आता मुक्त पत्रकारिता; एवढे सगळे पैलू एकाच व्यक्तीत एकवटलेले असणं तसं विरळाच ! कार्यालयीन सहकारी आणि मित्र या नात्यानं आमचा घनिष्ठ ऋणानुबंध जुळला. असे माझे हे ज्येष्ठ स्नेही संजय देवधर आज दि.१३ जुलै रोजी ६३व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.या औचित्यानं मला भावलेल्या त्यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचं हे शब्दचित्र...     एका मध्यमवर्गीय, मात्र विद्याव्रती अशा परिवाराचा वारसा संजय देवधर यांना लाभला. त्यांचे पणजोबा प्राणाचार्य कृष्णशास्त्री देवधर हे  प्रख्यात वैद्य होते. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरलेली होती. नाशिकच्या रविवार पेठेतील त्यांचा वाडा असलेल्या गल्लीला तत्कालीन नगरपालिकेने देवधर गल्ली असे नाव सन्मानपूर्वक दिले होते, आजही ही गल्ली याच नावाने ओळखली जाते. अशा प्रसिद्ध  घराण्यात जन्मलेल्या संजय यांना चित्रकलेची उपजत आवड होती. नामांकित पेठे विद्याल

कवी अमोल बागुल यांचा "मुक्काम आयसीयू कोविड वॉर्ड" काव्यसंग्रह ऐतिहासिक दस्तऐवज आणि सृजनात्मक कलाकृती- कविवर्य आम. लहू कानडे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस , नासिक   7387333801 मुक्काम आयसीयू (कोविड वॉर्ड) काव्यसंग्रह ऐतिहासिक दस्तऐवज आणि सृजनात्मक कलाकृती  : कविवर्य आ.लहू कानडे अहमदनगर : “आजही न संपलेल्या वेदनेला मुहतोड जबाब देणारी अमोल बागुल यांची कविता ही फक्त कविता नसुन कोरोना काळातील एक ऐतिहासिक दस्तऐवज आणि सृजनात्मक कलाकृती आहे,” असे मत कविवर्य आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केले.*          वाचकपीठच्या अकराव्या दृकचित्र साहित्य चर्चा (वेबिनार) मध्ये अध्यक्षपदावरून ते बोलत होते.नाशिक मनपा चे सहा.आयुक्त तथा कवी अमोल बागुल यांच्या “मुक्काम आयसीयू (कोविड वॉर्ड)” या काव्यसंग्रहावर चर्चा करण्यात आली.याचर्चेमध्ये प्रा.डॉ. गंगाधर अहिरे,नाशिक,प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे,सिन्नर, प्राचार्य चंद्रकांत भोसले इ मान्यवर सहभागी झाले होते.        पुढे बोलतांना आ.लहू कानडे म्हणाले कि, “जगण्याचा आत्मविश्वास गमावणारी माणसे कोरोनाने गेली,आशा परिस्थितीमध्ये अमोल बागुल संवेदनशीलपणे लिहित राहिले,कवितेने त्यांना जगण्याचे बळ तर दिलेच पण कविता चौकाचौकात,मोह्ल्या मोहल्यात वाचली तर माणसांच्या जगण्याला हातभार लागेल अशी प्रबोधनात्मक आहे.”  प

न्यूज मसाला दि. ८ जुलै च्या अंकात- संपादकीय- डोंगर हादरले अन् झाडे झाली भयभीत ! जनजाती समाजाला वनांवर अधिकार देण्यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार ! इन्कलाब पुस्तक प्रकाशन-कायद्याचे राज्य बळकट करून विवेकी विचारांची गरज- सरकारी वकील शिशिर हिरे यांचे प्रतिपादन !! गांव समृद्ध तर मी समृद्ध या संकल्पनेतून रोहयो च्या लेबर बजेटची आखणी करा- अपर मुख्य सचिव !!! जिल्हा बँका डबघाईला का आल्या - दिलीप देशपांडे !! मॅग्मो प्रकाश नावाचे वादळ काळाच्या पडद्याआड- जी.पी.खैरनार !! सचित्र पर्जन्यसूक्त- संजय देवधर !! पोलिस एफआयआर दाखल करून घेत नाहीत-मनपा उपायुक्त !! शहर बससेवेचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते उद्घाटन !! ग्रामीण भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक गावाची- पालकमंत्री छगन भुजबळ !! श्रीराम महाराज बेलेकर अनंतात विलीन !! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
Editorial डोंगर हादरले अन् झाडे झाली भयभीत !    नाशिक शहरासह परिसर व जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली सध्या निसर्ग धोक्यात आला आहे. त्यामुळे सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगर हादरले असून पुरातन वृक्षसंपदा भयभीत झाली आहे. गौण खनिजांसाठी डोंगराच्या पायथ्याशी स्फोट घडवून डोंगर उध्वस्त केले जातात. सर्वोच्च व उच्च न्यायालयाने स्पष्टपणे निर्देश दिलेले असतांना बिनदिक्कतपणे दिवसाढवळ्या अवैध वृक्षतोड केली जाते. संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय दिसतात. त्याबद्दल संतापाची लाट उसळली आहे. हॅशटॅग चिपको चळवळ, उत्तुंग झेप फाउंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालयाने नियुक्त केलेला टास्क फोर्स व विविध निसर्गप्रेमी, पर्यावरण तज्ज्ञ यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.      त्र्यंबकेश्वरजवळ ब्रम्हगिरी पर्वतातून गोदावरी नदीचा उगम होतो. तेथेच अवैधरीत्या उत्खनन सुरू झाल्याने संतापाचा उद्रेक झाला. ते थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कृती समिती नेमली. त्यावरूनही वाद झाले. या समितीत उत्खननात सामील असणाऱ्यांनाच सहभागी करून घेतल्याची तक्रार पर्यावरण तज्ज्ञ असणाऱ्यांनी केली. नंतर त्यांनाही सामावून घेण्यात आले. त्याचदरम्यान दुस

पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नऊ विधेयके दोन्ही सभागृहात संमत !! एका दृष्टिक्षेपात दोन दिवसीय अधिवेशन सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सौजन्य:- NEWS DAILY  मुख्यमंत्री सचिवालय पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नऊ विधेयके दोन्ही सभागृहात संमत मुंबई दि. ६:  पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचाच असला तरीही या अधिवेशनात जनतेच्या हिताचे कामकाज करता आले याचे समाधान आहे असे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या अधिवेशनात ९ विधेयके दोन्ही सभागृहांनी मंजूर केली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते. या दोन दिवसाच्या अधिवेशनात खालीलप्रमाणे कामकाज झाले त्याविषयी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी माहिती दिली . १.     मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा शिथील करण्याची केंद्र शासनाला शिफारस करणारा ठराव २.     ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळविण्याचा ठराव ३.     2014 च्या ईएसबीसी उमेदवारांना मोठा दिलासा. तात्पुरत्या नियुक्त्या, वयोमर्यादेत वाढ ४.     लवकरच महाराष्ट्र आयोगामार्फत १५ हजार ५१५ वर्ग

निसर्गाशी मानवाचे असलेले अतूट नाते हेच त्यांच्या चित्रांचे अधिष्ठान व भावविश्व ! सचित्र पर्जन्यसूक्त !! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सचित्र पर्जन्यसूक्त     पावसाळ्याच्या प्रारंभी जून, जुलै महिन्यात आदिवासी वारली चित्रकार पावसाची, शेतीची, पावसात नाचणाऱ्या मोरांची चित्रे काढतात. झोपडीच्या भिंतीवर अशी चित्रे काढण्यामागे चांगले पीक तयार होऊन अन्नधान्याने समृद्धी यावी, हा प्रामाणिक उद्देश असतो. निसर्गावर त्यांची अपार श्रद्धा आहे. वारली जमात पावसारंभी जणू एका तालासुरात सचित्र पर्जन्यसूक्त गात असते. ढगातून जमिनीवर येणाऱ्या पावसाच्या  धारा अन् सरी, आनंदाने थुईथुई नृत्य करणारे मोर, आकाशात पसरलेले इंद्रधनुष्य, शेतातील पेरणी, शेतकऱ्यांची लगबग, गुरेढोरे, शेतीची अवजारे व निसर्गाची विविध रूपे यांचा चित्रांमध्ये समावेश असतो. केवळ पांढऱ्या रंगात रंगविलेल्या इंद्रधनुष्यात सप्तरंगांची उणीव भासत नाही हे विशेष !     आदिवासी वारली जमात शेतीसंस्कृती जपते. त्यांच्या जगभर लोकप्रिय झालेल्या चित्रसंस्कृतीलाही ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. त्यामुळेच वारली चित्रशैलीत शेतात काम करणारे स्त्रीपुरुष, झाडेझुडपे, विहिरी, पशुपक्षी, सरपटणारे प्राणी, उंदीर, बेडूक अशा शेतीला उपयुक्त घटकांना महत्त्वाचे स्थान दिले जाते. निसर्गाशी मानवा