कवी अमोल बागुल यांचा "मुक्काम आयसीयू कोविड वॉर्ड" काव्यसंग्रह ऐतिहासिक दस्तऐवज आणि सृजनात्मक कलाकृती- कविवर्य आम. लहू कानडे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


न्यूज मसाला
सर्विसेस,
नासिक   7387333801

मुक्काम आयसीयू (कोविड वॉर्ड) काव्यसंग्रह
ऐतिहासिक दस्तऐवज आणि सृजनात्मक कलाकृती  : कविवर्य आ.लहू कानडे

अहमदनगर : “आजही न संपलेल्या वेदनेला मुहतोड जबाब देणारी अमोल बागुल यांची कविता ही फक्त कविता नसुन कोरोना काळातील एक ऐतिहासिक दस्तऐवज आणि सृजनात्मक कलाकृती आहे,” असे मत कविवर्य आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केले.*
         वाचकपीठच्या अकराव्या दृकचित्र साहित्य चर्चा (वेबिनार) मध्ये अध्यक्षपदावरून ते बोलत होते.नाशिक मनपा चे सहा.आयुक्त तथा कवी अमोल बागुल यांच्या “मुक्काम आयसीयू (कोविड वॉर्ड)” या काव्यसंग्रहावर चर्चा करण्यात आली.याचर्चेमध्ये प्रा.डॉ. गंगाधर अहिरे,नाशिक,प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे,सिन्नर, प्राचार्य चंद्रकांत भोसले इ मान्यवर सहभागी झाले होते.
       पुढे बोलतांना आ.लहू कानडे म्हणाले कि, “जगण्याचा आत्मविश्वास गमावणारी माणसे कोरोनाने गेली,आशा परिस्थितीमध्ये अमोल बागुल संवेदनशीलपणे लिहित राहिले,कवितेने त्यांना जगण्याचे बळ तर दिलेच पण कविता चौकाचौकात,मोह्ल्या मोहल्यात वाचली तर माणसांच्या जगण्याला हातभार लागेल अशी प्रबोधनात्मक आहे.”  प्रा.डॉ.शंकर बो-हाडे म्हणाले कि,“समकालीन वास्तवाची दाहकता दाखविण्यासाठी भविष्यात हा काव्यसंग्रह आणि हि कविता सर्वात पुढे राहील.”                                                  “मुक्काम आयसीयू (कोविड वॉर्ड)” हा काव्यसंग्रह म्हणजे मरणकळांची वेदनावळ असुन यातील आत्मसंवाद वाचकांच्या मनाचा ठाव घेणारा आहे.” असे मत प्रा.डॉ.गंगाधर आहिरे यांनी व्यक्त केले.यावेळी दादा नन्नवरे,भानुदास महानोर,प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी काव्यसंग्रहावर मत मांडले.
         कवी अमोल बागुल मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कि, ”परिवर्तनवादी चळवळीशी नात सांगणारी आणि वस्तुस्थितीशी समरस असणारी कविता मी गेल्या वीस वर्षापासून लिहित असून कोरोना च्या महामारीत सक्तीच्या एकांतवासातही सकारात्मकता आणि जगण्याची उमेद वाढविण्यासाठी हिच कविता कामी आली.” यावेळी त्यांनी दोन कवितांचे सादरीकरण केले.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिया धारूरकर यांनी केले तर पाहुण्याची ओळख शब्दगंध चे सुनील गोसावी व कवी किरण भावसार यांनी करून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी भास्कर निर्मळ पाटील यांनी केले.शेवटी कवयित्री माधुरी चौधरी यांनी आभार मानले,यावेळी प्रा.डॉ.शंकर चव्हाण,कवयित्री शर्मिला गोसावी,अश्विनी निकम,अतुल गांगुर्डे,भास्कर दादा लगड,मारुती सावंत, बुध्दभूषण,देवेंद्र उबाळे,दिनकर पवार, संगीता फसाटे,योगिता पाटील,सुनील गोसावी यांच्यासह अनेक साहित्यिक,कवी सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!