पोस्ट्स

ग्रामविकासाची शाळा ! सर्वसाधारण पंचवार्षिक सभांचे इतिवृत्त पुस्तक रुपात प्रसिद्ध होणारे महाराष्ट्र राज्यातील पहिलेच पुस्तक !

इमेज
नाशिक जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त पुस्तक रुपात प्रसिद्ध !         नाशिक जिल्हा परिषदेचे २१मार्च, २०१२ ते २० मार्च, २०१७ या कालावधीतील पंचवार्षिक सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त "ग्रामविकासाची शाळा" हे शीर्षक घेऊन प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या पुस्तकाचे संपादक म्हणून उपमुख्य कार्यकारी आनंदराव पोपट पिंगळे यांनी जबाबदारी स्विकारुन पुस्तकाचे संकलन व संकल्पना आरोग्य विभागाचे मुख्य औषध निर्माण अधिकारी जी.पी. खैरनार यांनी केले आहे. जिल्हा परिषदेत दिनांक २८फेब्रुवारी, २०२२ रोजी ऑनलाईन पद्धतीद्वारे सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या मध्यान्ह काळात "ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकाचे प्रकाशन अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, ऑनलाइन सभेत उपस्थित आरोग्य व शिक्षण समिती सभापती सौ. सुरेखाताई दराडे, समाजकल्याण समिती सभापती सौ. सुशिला मेंगाळ, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजय बनकर, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती अश्विनीताई आहेर, अतिरिक्त म

विद्यार्थी सदिच्छा समारंभ ! ज्या क्षेत्राची तुम्हांला मनापासून आवड आहे, त्याच क्षेत्राकडे वळा- संजय खोचारे

इमेज
१२ वी विद्यार्थी सदिच्छा समारंभ ! गारगोटी(२८, प्रतिनिधी)::-विस्तीर्ण जगात विविध क्षेत्रात तुमच्यासाठी खूप संधी उपलब्ध आहेत. आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन परिश्रम करा, यश तुमच्या मागून धावत येईल असे प्रतिपादन संजय खोचारे यांनी केले. श्री आनंदराव आबिटकर इंग्लिश मिडीअम स्कूल व ज्युनिअर काॕलेज मध्ये १२ वी विद्यार्थी सदिच्छा समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. प्राचार्य बाजीराव जठार अध्यक्षस्थानी होते. तर अजितदादा आबिटकर प्रमुख उपस्थित होते.            यावेळी बोलतांना खोचारे म्हणाले , दुसऱ्याने निवडले म्हणून तुम्ही तेच क्षेत्र निवडू नका. ज्या क्षेत्राची तुम्हांला मनापासून आवड आहे, त्याच क्षेत्राकडे वळा. अभ्यासाचे नियोजन करा. आजचे श्रम उद्या सुखाचे दिवस दाखवतील. स्वागत गुरूनाथ शेणवी यांनी केले. प्रास्तविक प्राचार्य बाजीराव जठार यांनी केले. सुत्रसंचालन स्नेहल सुतार यांनी केले. यावेळी माधुरी अस्वले , हरिप्रिया चुडेकर, सानिका गोडसे, आयुषी देसाई यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी निलम चौगले, विजय ईर हे शिक्षक हजर होते. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संज

नवाब मलिकांच्या पाठिशी राष्ट्रवादी ठाम !

इमेज
नवाब मलिकांच्या पाठिशी राष्ट्रवादी ठाम ! मुंबई ::-तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मनी लॉंड्रिंगच्या प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. ३ मार्च पर्यंत त्यांना कोठडी सुनावली आहे. त्याचा तीव्र निषेध करत शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश येवले, प्रदेश सचिव बबन कनावजे, महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली कडणे, शरद श्रृंगारे, विलास तळेकर, राजेश राणे, रमेश चौबे, अनिल कदम, सुभाष गोरेगावकर, रवी कदम, सुमीत राणे यांच्या समवेत संतप्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी इडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात शिवडी नाका येथे जोरदार घोषणाबाजी केली. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची अटक चुकीची असल्याचं सांगत राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या मागे ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायचा नाही असं पक्षाच्या बैठकीत ठरलं आहे. तसेच महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनीही राष्ट्रवादीच्या या भूमिकेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर ते मंत्रिपदाचा राजीनामा

माझी माय मराठी ३) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा !

इमेज
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विलेपार्लेचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी भाषा दिन व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विलेपार्ले शाखेचा वर्धापनदिन सोहळा प्रबोधनकार ठाकरे संकुल विलेपार्ले येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि रसिक श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे तसेच  ज्येष्ठ लेखक अरुण फडके यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे लिखित 'देशोदेशीच्या लोककथा' या ४ बाल कथासंग्रहाचे व लता गुठे लिखित मुलांसाठी मजेदार काव्यकोडी अशा ५ पुस्तकांचे प्रकाशन झाले. प्रबोधनकार ठाकरे संकुलचे अरविंद प्रभू आणि लेखक गुरुनाथ तेंडुलकर यांची विशेष उपस्थिती यावेळी होती.        मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विलेपार्लेच्या वतीने स्वरचित कथा स्पर्धेच्या पुरस्कारांचे वितरण मंदाकिनी भट आणि पूजा राईलकर यांच्या हस्ते झाले. चित्रा वाघ यांना प्रथम पुरस्कार, उज्वला पै यांना द्वितीय पुरस्कार आणि चारुलता काळे यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. 'पुस्तकं माणसाला घडव

मिरजच्या डॉ. रविंद्र फडकेंना क्लासेस संघटनेचा "सेवादीप" पुरस्कार प्रदान! पालकांनी मुलांवर लहानपणापासूनच समाजसेवेचे संस्कार करावेत- डॉ. फडके

इमेज
मिरजच्या डॉ. रविंद्र फडकेंना क्लासेस संघटनेचा "सेवादीप" पुरस्कार प्रदान! नाशिक (प्रतिनिधी)::-आयुष्यात शंभरपेक्षा जास्त वेळा रक्तदान करणारे, विविध सामाजिक उपक्रम रराबवणारे, ३८ वर्षे अध्यापनाचे कार्य आणि राज्यसंघटना मजबूतीसाठी नेहमीच झटणारे, मिरजेचे डॉ. रविंद्र फडके यांना, कोचिंग क्लासेस संचालक संघटना नाशिकच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा "सेवादीप पुरस्कार " आज संघटनेच्या कार्यालयाच्या सभागृहात, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल श्रीफळ दैऊन, संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी फडके म्हणाले की, "नविन पिढीतल्या तरुणांमध्ये, समाजसेवेची आवड क्वचितच दिसते आहे. मोबाईल, नोकरी व्यवसाय यामध्ये त्यांचा वेळ इतका जातो की, त्यांची समाजकार्याची जाणीवच बोथट होत चालली आहे यासाठी पालकांनी लहानपणापासूनच समाजसेवेचे संस्कार करावेत. "यावेळी मिनाक्षी फडके, संघटनेचे उपाध्यक्ष अशोक देशपांडे, राज्य प्रतिनिधी रविंद्र पाटील, माजी अध्यक्ष प्रकाश डोशी, दिफक गुप्ता, संतोष पवार, खजिनदार लोकेश पारख. प्रतिभा देवरे आदी पदाधिकारी व क्लासेस संचालक उपस्थित होते.

रसिकांना मिळाली लतायुगाची सुरेल अनुभूती !

इमेज
रसिकांना मिळाली लतायुगाची सुरेल अनुभूती !         नाशिक ( प्रतिनिधी ):- स्वर्गीय भारतरत्न लतादीदींची सुरेल गाणी सादर करून काल नाशिकच्या गायिका व गायकांनी भावस्वरांची सुरांजली अर्पण केली. गायिकांनी सोलो गाणी गाऊन आपली स्वरसमिधा वाहिली. गायकांनी युगलगीतात स्वरसाथ दिली. रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून लतायुगाची अनुभूती मिळवली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफलीत स्वरसम्राज्ञी लतादीदींच्या सुरेल आठवणींना उजाळा मिळाला.प्रारंभी प्रमुख पाहुणे संगीतकार संजय गीते, गायक संजय किल्लेदार, पत्रकार संजय देवधर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.गीतेंनी अनुभव सांगितले.             नंदकुमार देशपांडे संचलित सरगम म्युझिक अकॅडमीतर्फे काल शनिवारी ( दि.२६) भारतरत्न लतादीदींना भावस्वरांची सुरांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ' मेरी आवाज ही पहेचान है..' ही सुरेल मैफल पंचवटी कारंजा जवळ लक्ष्मीबाळ सदन सभागृहात सायंकाळी झाली. तेरे बिना जिया जाए ना..., जिंदगी प्यार का गीत है..., दिल दिवाना बिन सजना के..., ए हवा मेरे संग संग चल..., सायोनारा सायोनारा..., तुम ही मेर

माझी माय मराठी ! २) स्मिता दळवी, खारघर, नवी मुंबई

इमेज
"मराठी भाषा दिवस" माय मराठी... साद मराठी "मराठी भाषेचा गंध जाई जुई मोग-याचा, लावू कपाळी टिळा माय मराठी मातीचा" मराठी साहित्याचा मानदंड असणारे, त्या अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार , लघूनिबंधकार व आस्वादक समीक्षक म्हणजे विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर, अर्थात आपल्या सर्वांचेच लाडके कवी "कुसुमाग्रज" यांचा २७ फेब्रुवारी म्हणजे आज जन्मदिवस, अर्थात "मराठी राजभाषा दिवस" तथा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो.  प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवर प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्यं आहेत.             आज मराठी राजभाषा दिवस आपण साजरा करत असताना एकच जाणवतं की जन्मल्यापासून लहान मुलं आपल्या आईजवळ तसंच स्नेहजनांच्या जवळ असतं तेव्हा ती आई किंवा आजूबाजूचे स्नेहजन ज्या भाषेत मुलांसोबत बोलतात, संवाद साधतात स्वाभाविकच मुलांची तीच मायबोली म्हणजे मातृभाषा होऊन जाते. महाराष्ट्रातील मराठी भाषा प्रत्येक प्रांतात निराळी आहे.  मराठी भ