माझी माय मराठी ३) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा !


मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विलेपार्लेचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात
साजरा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी भाषा दिन व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विलेपार्ले शाखेचा वर्धापनदिन सोहळा प्रबोधनकार ठाकरे संकुल विलेपार्ले येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि रसिक श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे तसेच  ज्येष्ठ लेखक अरुण फडके यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे लिखित 'देशोदेशीच्या लोककथा' या ४ बाल कथासंग्रहाचे व लता गुठे लिखित मुलांसाठी मजेदार काव्यकोडी अशा ५ पुस्तकांचे प्रकाशन झाले. प्रबोधनकार ठाकरे संकुलचे अरविंद प्रभू आणि लेखक गुरुनाथ तेंडुलकर यांची विशेष उपस्थिती यावेळी होती.
       मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विलेपार्लेच्या वतीने स्वरचित कथा स्पर्धेच्या पुरस्कारांचे वितरण मंदाकिनी भट आणि पूजा राईलकर यांच्या हस्ते झाले. चित्रा वाघ यांना प्रथम पुरस्कार, उज्वला पै यांना द्वितीय पुरस्कार आणि चारुलता काळे यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. 'पुस्तकं माणसाला घडवतात' या विषयावर, ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, नगरसेविका, लेखिका ज्योती आळवणी यांच्याशी सायली वेलणकर यांनी सुसंवाद साधला. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखेच्या अध्यक्षा लता गुठे यांनी कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले होते. सूत्रसंचालन प्रशांत राऊत व सायली वेलणकर यांनी केले तर आभार निशा वर्तक यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!