विद्यार्थी सदिच्छा समारंभ ! ज्या क्षेत्राची तुम्हांला मनापासून आवड आहे, त्याच क्षेत्राकडे वळा- संजय खोचारे


१२ वी विद्यार्थी सदिच्छा समारंभ
!

गारगोटी(२८, प्रतिनिधी)::-विस्तीर्ण जगात विविध क्षेत्रात तुमच्यासाठी खूप संधी उपलब्ध आहेत. आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन परिश्रम करा, यश तुमच्या मागून धावत येईल असे प्रतिपादन संजय खोचारे यांनी केले. श्री आनंदराव आबिटकर इंग्लिश मिडीअम स्कूल व ज्युनिअर काॕलेज मध्ये १२ वी विद्यार्थी सदिच्छा समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. प्राचार्य बाजीराव जठार अध्यक्षस्थानी होते. तर अजितदादा आबिटकर प्रमुख उपस्थित होते.
           यावेळी बोलतांना खोचारे म्हणाले , दुसऱ्याने निवडले म्हणून तुम्ही तेच क्षेत्र निवडू नका. ज्या क्षेत्राची तुम्हांला मनापासून आवड आहे, त्याच क्षेत्राकडे वळा. अभ्यासाचे नियोजन करा. आजचे श्रम उद्या सुखाचे दिवस दाखवतील. स्वागत गुरूनाथ शेणवी यांनी केले.
प्रास्तविक प्राचार्य बाजीराव जठार यांनी केले. सुत्रसंचालन स्नेहल सुतार यांनी केले. यावेळी माधुरी अस्वले , हरिप्रिया चुडेकर, सानिका गोडसे, आयुषी देसाई यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी निलम चौगले, विजय ईर हे शिक्षक हजर होते. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संजय खोचारे यांच्या  हस्ते झाले. शेवटी आभार सोनाली यादव यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !