मिरजच्या डॉ. रविंद्र फडकेंना क्लासेस संघटनेचा "सेवादीप" पुरस्कार प्रदान! पालकांनी मुलांवर लहानपणापासूनच समाजसेवेचे संस्कार करावेत- डॉ. फडके




मिरजच्या डॉ. रविंद्र फडकेंना क्लासेस संघटनेचा "सेवादीप" पुरस्कार प्रदान!

नाशिक (प्रतिनिधी)::-आयुष्यात शंभरपेक्षा जास्त वेळा रक्तदान करणारे, विविध सामाजिक उपक्रम रराबवणारे, ३८ वर्षे अध्यापनाचे कार्य आणि राज्यसंघटना मजबूतीसाठी नेहमीच झटणारे, मिरजेचे डॉ. रविंद्र फडके यांना, कोचिंग क्लासेस संचालक संघटना नाशिकच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा "सेवादीप पुरस्कार " आज संघटनेच्या कार्यालयाच्या सभागृहात, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल श्रीफळ दैऊन, संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी फडके म्हणाले की, "नविन पिढीतल्या तरुणांमध्ये, समाजसेवेची आवड क्वचितच दिसते आहे. मोबाईल, नोकरी व्यवसाय यामध्ये त्यांचा वेळ इतका जातो की, त्यांची समाजकार्याची जाणीवच बोथट होत चालली आहे यासाठी पालकांनी लहानपणापासूनच समाजसेवेचे संस्कार करावेत. "यावेळी मिनाक्षी फडके, संघटनेचे उपाध्यक्ष अशोक देशपांडे, राज्य प्रतिनिधी रविंद्र पाटील, माजी अध्यक्ष प्रकाश डोशी, दिफक गुप्ता, संतोष पवार, खजिनदार लोकेश पारख. प्रतिभा देवरे आदी पदाधिकारी व क्लासेस संचालक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।