पोस्ट्स

ध्रुव शाखा हा सर्वांना जोडणारा अतूट धागा - डॉ. गोविलकर

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा,  ध्रुव शाखा हा सर्वांना  जोडणारा अतूट धागा आनंदमेळाव्यात डॉ. गोविलकर यांचे प्रतिपादन                         नाशिक ( प्रतिनिधी ):- शताब्दीकडे झेपावणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहर संघचालकपदाचे दायित्व निभावणे ही मोठी जबाबदारी आहे. डॉ.विजय मालपाठक यांची निवड ते सार्थ ठरवतील व कौशल्याने नेतृत्व करतील. कारण ध्रुव शाखेचे पाठबळ त्यांना असून तो सर्वांना जोडणारा अतूट धागा आहे असे प्रतिपादन श्रीगुरुजी  रुग्णालयाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी केले. ते ध्रुव शाखेच्या आनंदमेळाव्यात बोलत होते.      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ध्रुव शाखेने दोन वर्षांपूर्वी ५० वर्षे पूर्ण केली. मात्र कोरोनाच्या  लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष शाखा व गाठीभेटी झाल्या नाहीत. रामनवमीच्या निमित्ताने रविवारी नानाराव ढोबळे सभागृहात आनंदमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी नूतन शहरसंचालक डॉ. विजय मालपाठक यांचा सत्कार प्रांत संघचालक नाना जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विनायक गोविलकर उपस्थित होते. ते म्हणाले, डॉ. मालपाठक यांच्यारूपाने योग्य व्यक्ती

एका दिवसात जगप्रसिद्ध व लोकप्रिय वारली चित्रकला शिकण्याची संधी !

इमेज
फक्त एका दिवसात वारली चित्रकला शिका !         नाशिक ( प्रतिनिधी )  जगप्रसिद्ध व लोकप्रिय वारली चित्रकला शिकण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. दि. १४ ते १७ एप्रिल दरम्यान एकदिवसीय वारली चित्रकार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ५ ते ७५ या वयोगटातील कलाप्रेमींना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवशी कार्यशाळेत सशुल्क सहभागी होता येईल. सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत होणाऱ्या या कार्यशाळेत वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर मार्गदर्शन करणार आहेत. सोनिया अपार्टमेंट, इंद्रकुंड, पंचवटी, नाशिक येथे कार्यशाळा होईल. सहभागी होणाऱ्या सर्वांना आवश्यक सर्व साहित्य व सर्टिफिकेट दिले जाईल. नावनोंदणीसाठी आजच ९४२२२७२७५५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

अकरा विद्यार्थ्यांना हजारो रुपयांचे कोर्सेस मोफत देण्यात आले ! उद्याही करियर मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, 7387333801, करियर मार्गदर्शन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद  !       नासिक (प्रतिनिधी)::-केटीएचएम महाविद्यालय माजी विद्यार्थी संघातर्फे आयोजित दोन दिवसीय करियर गायडन्स सेमिनारचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादात संपन्न झाला, ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. याप्रसंगी केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. बी. गायकवाड  यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांविषयी माहिती दिली.           कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रा. सीए लोकेश पारख यांनी कॉमर्स व स्पर्धा परीक्षा क्षेत्रांमध्ये झालेले बदल व विद्यार्थ्यांसाठी असलेल्या नवीन संधींविषयी माहिती दिली. प्रा. माधवी पगारिया यांनी ॲनिमेशन व कंप्यूटर संबंधित विविध कोर्सेसची तर प्रा. समीना शेख यांनी सायन्स मधील करिअरच्या संधी याविषयी माहिती दिली      उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू सोबतच ॲनिमेशन, बेसिक ऑफ कॉमर्स व बेसिक ऑफ सायन्स संदर्भात कोर्सेस मोफत देण्यात आले.                 लकी ड्रॉ द्वारे उपस्थित विद्यार्थ्यांपैकी अकरा विद्यार्थ्यांना हजारो रुपयांचे कोर्सेस

सुनील गोसावी यांना वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे ग्रंथ पुरस्कार घोषित !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, 7387333801, सुनील गोसावी यांना वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे ग्रंथ पुरस्कार घोषित !   अहमदनगर :  (वार्ताहर )येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त  सुनील गोसावी यांना वाचन संस्कृती प्रबोधन उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.    अहमदनगर येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, सचिव सुनील राम गोसावी यांच्या 'आठवणींचा डोह 'ह्या आत्मपर ग्रंथास हा पुरस्कार घोषित करण्यात आला, राष्ट्र सह्याद्री मध्ये माझ्या मनातलं या लेखमाले द्वारे सुनील गोसावी यांनी आपला जीवनप्रवास उलगडून दाखवला होता, साडेतीन महिने चाललेल्या या लेखमालेचे "आठवणींचा डोह" हे पुस्तकं नुकतेच पद्मश्री  पोपटराव पवार, आमदार लहू कानडे, कॉ भालचंद्र कांगो, प्रा डॉ प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले आहे,    प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक माजी प्राचार्य टी. ई. शेळके, संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, उपाध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे, कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये, ग्रंथ परीक्षक डॉ. शिवाजी काळे, डॉ. रामकृष्ण जगताप, उपाध्यक्ष संगीता फासाटे, प्रा. शि

सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांच्या संघटनेची पुनर्रचना !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, ७३८७३३३८०१ सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांच्या संघटनेची पुनर्रचना ! अध्यक्षपदी विश्वास रणदिवे, सचिवपदी शशिकांत सपकाळ           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेशी संलग्न सार्वजनिक बांधकाम विभाग व आमदार निवास येथील चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या संघटनेची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यावेळी राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि मूंबई जिल्हा संघटनेचे सरचिटणीस प्रकाश बने यांच्या मार्गदर्शनाबरोबरच नवनियुक्त सदस्यांचा सत्कार समारंभदेखील फोर्ट येथील बांधकाम भवन येथे आयोजित करण्यात आला. संघटनेच्या अध्यक्षपदी विश्वास रणदिवे आणि सचिवपदी शशिकांत सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे.          यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता, उप-अभियंता, शाखा अभियंता व इतर वरीष्ठ पदाधिकारी तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने, कार्यालय सचिव बाबाराम कदम, कार्यालय प्रमुख मनोहर दिवेकर, कार्यालय सहाय्यक कृष्णा भरडे त्याचप्रम

जल जीवन अभियान आणि स्वच्छ भारत अभियान ची प्रगती आणि पुढील आराखडा यांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने उद्या प्रादेशिक परिषदेचे आयोजन !

इमेज
केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या ८ एप्रिल २०२२ रोजी जयपूर येथे देशातील ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची प्रादेशिक परिषद आयोजित ! जल जीवन अभियान आणि स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या अभियानांची प्रगती आणि पुढील आराखडा यांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने या प्रादेशिक परिषदेचे आयोजन ! नवी दिल्ली::- जल जीवन अभियान आणि स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या अभियानांची प्रगती आणि पुढील आराखडा यांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने उद्या ८ एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षपद केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत भूषविणार आहेत. या प्रादेशिक परिषदेत सहभागी होणाऱ्या ८ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, लडाख, दमन आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली यांचा समावेश आहे. या परिषदेला ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० राज्यातील  जल मंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. अत्यंत महत्त्वाच्या अशा या दोन्ही सरकारी अभियानांनी प्रत्येक र

तांत्रिक अडचणीमुळे ५३.१२ कोटींचा निधी शासनास परत !

इमेज
न्यूज मसाला, नासिक ७३८७३३३८०१ केवळ तांत्रिक अडचणीमुळे ५३.१२ कोटींचा निधी शासनास परत !--जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी नाशिक दिनांक ७ (जिमाका)::- जिल्हा नियोजन अधिकारी किंवा जिल्हा नियोजन समिती कार्यालयामार्फत जिल्हा नियोजनाचा निधी शासनास परत जाण्याबाबत कोणतेही अधिकृत वृत्त प्रसिद्धीसाठी देण्यात आलेले नाही. तसेच केवळ तांत्रिक अडचणींमुळे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा ५३.१२ कोटी रुपयांचा निधी शासनास परत गेला असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी कि. बा. जोशी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.         याबाबत जिल्हा नियोजन अधिकारी जोशी यांनी दिलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबत जिल्हा नियोजन अधिकारी किंवा जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती अथवा बातमी देण्यात आलेली नाही. परंतु काही वृत्तपत्र व प्रसार माध्यमांमध्ये जिल्हा नियोजन अधिकारी व जिल्हा नियोजन कार्यालय यांचा स्त्रोत म्हणून संदर्भ देवून अनधिकृत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बीडीएस स्लिप न निघणे किंवा बीडीएस प्रणालीवर निधी वितरीत करता न येणे