एका दिवसात जगप्रसिद्ध व लोकप्रिय वारली चित्रकला शिकण्याची संधी !

फक्त एका दिवसात वारली चित्रकला शिका !
        नाशिक ( प्रतिनिधी )  जगप्रसिद्ध व लोकप्रिय वारली चित्रकला शिकण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. दि. १४ ते १७ एप्रिल दरम्यान एकदिवसीय वारली चित्रकार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ५ ते ७५ या वयोगटातील कलाप्रेमींना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवशी कार्यशाळेत सशुल्क सहभागी होता येईल.

सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत होणाऱ्या या कार्यशाळेत वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर मार्गदर्शन करणार आहेत. सोनिया अपार्टमेंट, इंद्रकुंड, पंचवटी, नाशिक येथे कार्यशाळा होईल. सहभागी होणाऱ्या सर्वांना आवश्यक सर्व साहित्य व सर्टिफिकेट दिले जाईल. नावनोंदणीसाठी आजच ९४२२२७२७५५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता हातात हात घालून हदयास हदय जोडून बंधू सहाय्याला लाहो बलसागर भारत होवो - साने गुरुजी

विश्व मराठी संमेलन नासिकला होणार ! संमेलनात पुस्तक आदान-प्रदान उपक्रम राबविणार !