तांत्रिक अडचणीमुळे ५३.१२ कोटींचा निधी शासनास परत !

न्यूज मसाला, नासिक
७३८७३३३८०१

केवळ तांत्रिक अडचणीमुळे ५३.१२ कोटींचा निधी शासनास परत !--जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी

नाशिक दिनांक ७ (जिमाका)::- जिल्हा नियोजन अधिकारी किंवा जिल्हा नियोजन समिती कार्यालयामार्फत जिल्हा नियोजनाचा निधी शासनास परत जाण्याबाबत कोणतेही अधिकृत वृत्त प्रसिद्धीसाठी देण्यात आलेले नाही. तसेच केवळ तांत्रिक अडचणींमुळे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा ५३.१२ कोटी रुपयांचा निधी शासनास परत गेला असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी कि. बा. जोशी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

        याबाबत जिल्हा नियोजन अधिकारी जोशी यांनी दिलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबत जिल्हा नियोजन अधिकारी किंवा जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती अथवा बातमी देण्यात आलेली नाही. परंतु काही वृत्तपत्र व प्रसार माध्यमांमध्ये जिल्हा नियोजन अधिकारी व जिल्हा नियोजन कार्यालय यांचा स्त्रोत म्हणून संदर्भ देवून अनधिकृत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बीडीएस स्लिप न निघणे किंवा बीडीएस प्रणालीवर निधी वितरीत करता न येणे आदी तांत्रिक अडचणींमुळे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचे ५३.१२ कोटी रुपये शासनास परत गेले असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी जोशी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!