अकरा विद्यार्थ्यांना हजारो रुपयांचे कोर्सेस मोफत देण्यात आले ! उद्याही करियर मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन !

न्यूज मसाला वृत्तसेवा,
7387333801,

करियर मार्गदर्शन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद !

      नासिक (प्रतिनिधी)::-केटीएचएम महाविद्यालय माजी विद्यार्थी संघातर्फे आयोजित दोन दिवसीय करियर गायडन्स सेमिनारचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादात संपन्न झाला, ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. याप्रसंगी केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. बी. गायकवाड  यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांविषयी माहिती दिली.

          कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रा. सीए लोकेश पारख यांनी कॉमर्स व स्पर्धा परीक्षा क्षेत्रांमध्ये झालेले बदल व विद्यार्थ्यांसाठी असलेल्या नवीन संधींविषयी माहिती दिली. प्रा. माधवी पगारिया यांनी ॲनिमेशन व कंप्यूटर संबंधित विविध कोर्सेसची तर प्रा. समीना शेख यांनी सायन्स मधील करिअरच्या संधी याविषयी माहिती दिली


     उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू सोबतच ॲनिमेशन, बेसिक ऑफ कॉमर्स व बेसिक ऑफ सायन्स संदर्भात कोर्सेस मोफत देण्यात आले.                 लकी ड्रॉ द्वारे उपस्थित विद्यार्थ्यांपैकी अकरा विद्यार्थ्यांना हजारो रुपयांचे कोर्सेस मोफत देण्यात आले.


         उद्या रविवार दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी या करियर गायडन्स कार्यक्रमाचा उर्वरित भाग असेल, त्यामध्ये आजचा भाग सुद्धा परत सांगितला जाईल त्यामुळे आज जे  हजर राहू शकले नाही व ज्यांना संपूर्ण माहिती हवी आहे त्यांनी उद्या रावसाहेब थोरात सभागृहात उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!