वारली कलेने आदिवासी महिलांना व्यक्त होण्याची संधी दिली - श्रीमती लीना बनसोड, ( मुकाअ जिल्हा परिषद )
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक,. 7387333801 वारली कलेने आदिवासी महिलांना व्यक्त होण्याची संधी दिली - बनसोड नाशिक ( प्रतिनिधी ) :- महाराष्ट्राची वारली कला जगभरात पोहोचली आहे. या कलेने आदिवासी महिलांना व्यक्त होण्याची संधी दिली. त्यांनीही ११०० वर्षांची परंपरा जतन केली. वारली चित्रे दिसतात तेव्हढी सोपी नसतात. प्रत्यक्ष करतांना ते समजते. अनेक कलाकारांनी सुंदर वारली चित्रे रेखाटून प्रदर्शनात मांडली आहेत. पत्रकार व वारली चित्रकलेचे अभ्यासक संजय देवधर यांनी या उपक्रमाद्वारे त्यांना प्रकाशात आणले असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांनी केले. वारली आर्ट फाउंडेशन आणि पीएनजी आर्ट इनीशीटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने समूह वारली चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. नाशिकरोडच्या पु.ना. गाडगीळ अँड सन्सच्या कलादालनात या प्रदर्शनाचे उद्घाटन काल महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने करण्यात आले. उद्घाटक लीना बनसोड व प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, रंगकर्मी सतीश मोहोळे तसेच व्यवस्थापिका प्रविणा दुसाने आदी मान्यवर उपस्थित होते. संयोजक संजय देव