मुंबई दूरदर्शन च्या वतीने प्रेक्षकांना 'शब्दसूरांचा जादूगार संगीतकार,,,,,,," या लघुपटाची दि. ६ व ७ मे रोजी अनोखी भेट !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक

 मुंबई दूरदर्शन च्या वतीने प्रेक्षकांना 'शब्दसूरांचा जादूगार संगीतकार,,,,,,," या लघुपटाची दि. ६ व ७ मे रोजी अनोखी भेट !

`संगीतकार अशोक पत्की' लघुपटाचे दूरदर्शनवर ६ व ७ मे रोजी प्रसारण

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई दूरदर्शनच्या वतीने `शब्दसूरांचा जादूगार संगीतकार अशोक पत्की' या लघुपटाची निर्मिती केली आहे. त्याचे प्रसारण शुक्रवार दिनांक ६ मे रोजी सायंकाळी साडे सात वाजता आणि शनिवार दिनांक ७ मे रोजी दुपारी १.३० व रात्री १०.३० वाजता होईल. दूरदर्शनच्या माजी सहाय्यक संचालक निर्मात्या डॉ. किरण चित्रे यांनी त्याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. यासाठी दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक नीरज आगरवाल यांचे सहकार्य मिळाले आहे.

         अशोक पत्की हे संगीत विश्वातलं मोठं नाव, शास्त्रशुद्ध पद्धतीने संगीताचे शिक्षण न घेताही स्वकर्तृत्वाच्या बळावर त्यांनी संगीत क्षेत्रात अफाट आणि वैविध्यपूर्ण काम केले आहे.

त्यांच्या सांगितिक जीवनाची यशोगाथा रसिकांसमोर यावी, यासाठी या लघुपटाचे संकलन प्रफुल्ल मोहिते यांनी केले आहे तर संकलन प्रमुख शुभांगी सावंत यांनी समन्वयकाची जबाबदारी पार पाडली आहे. सहयाद्री वाहिनीच्या यु ट्युब चॅनेल आणि फेसबुकवरदेखील लाईव्ह स्ट्रिमिंग स्वरुपात हे प्रसारण उपलब्ध असेल.

************************************
आणखी वाचा!
पर्यटनाची मार्गदर्शक 'कार' कीर्द ! 
माझा कार प्रवास !!
http://www.newsmasala.in/2022/04/blog-post_24.html
**************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!