ब्रम्हाकुमारीज् संस्थेच्या वतीने व्यक्तिमत्व विकास शिबिराचे यशस्वी आयोजन !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक 

 ब्रम्हाकुमारीज् संस्थेच्या वतीने व्यक्तिमत्व विकास शिबिराचे यशस्वी आयोजन !
       
    नासिक::-ब्रम्हाकुमारीज् संस्थेच्या मुल्य शिक्षण ह्या विभागाद्वारे गंगापूर रोड नासिक येथील कॉमर्स मैनेजमेंट कम्प्युटर सायन्स कॉलेज येथे विद्यार्थांसाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर पाच दिवसीय कोर्स चे आयोजन करण्यात आले होते. 

        ब्रम्हाकुमारीज् संस्थेचे विकास साळुंके व प्राध्यापक सतिश भदाणे यांनी ब्रम्हाकुमारी वासंती दिदीजींच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे, प्राध्यापिका डॉ. वावीकर यांनी सहकार्य केले. 
         ब्रम्हाकुमारीज् गंगापूर रोड सेवा केंद्र संचालिका मनिषा दिदी यांनी विद्यार्थ्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर मार्गदर्शन करताना, सकारात्मक विचार, इमोशनल स्टॅबिलिटी, निर्णय शक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी टिप्स देताना विद्यार्थ्यांना गाईडेड मेडिटेशन चा अनुभव करवला. सोनी तर्वे यांनी गीतगायन केले. सुरेश साळुंके, तृप्ती देवरे, सतिश भदाणे, विकास साळुंके यांनीही विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास याविषयी सकारात्मक मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुनम पाटील, श्रीमती नीलिमा, श्रीमती सुचेता बच्छाव यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !