पोस्ट्स

पायोनिअर हार्ट हॉंस्पिटलला ‘सीजीएचएस’ मान्यता

इमेज
पायोनिअर हार्ट हॉंस्पिटलला ‘सीजीएचएस’ मान्यता ! नाशिक (प्रतिनिधी) : येथील पायोनिअर हार्ट हॉस्पिटलला सेंटर गव्हर्नमेंट हेल्थ स्किम (सीजीएचएस)ची मान्यता मिळाली आहे. हॉस्पिटलला सीजीएचएसची मान्यता मिळाल्यामुळे आता केंद्र सरकारच्या सेवेत सध्या कार्यरत असलेले  अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्त कर्मचार्‍यांचे मोफत उपचार पायोनिअर हार्ट हॉस्पिटलमध्ये होणार आहेत. पायोनिअर हार्ट हॉस्पिटल नाशिकमधील अग्रगण्य असून गेल्या ३ वर्षांपासून हृदयरोगावरील उत्कृष्ट सेवा देणारे हॉस्पिटल म्हणून नावलौकिक मिळवला आहे.  हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णास इमर्जन्सी उपचार, एन्जीओप्लास्टी तसेच बायपास(सिएबीजी)शस्त्रक्रिया येथे यशस्वीपणे केल्या जातात. डॉ. सुरेश सूर्यवंशी या हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभागाचे प्रमुख असून हृदययावरील उपचाराचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. डॉ. ललित लवणकर हे उत्तर महराष्ट्रातील एकमेव बालहृदयरोग तज्ज्ञ आहेत. नवजात शिशू मधील हृदयरोगावरील विविध उपचार करण्यात ते निपुण आहेत. हॉस्पिटलमधील अवघ्या ९५० ग्रॅम वजनाच्या बाळाची यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांनी या गोंडस शिशूला नवजीवन दिले आहे.  बाळांच्या अशा हृदय आ

जग हे पेशंट केअर आहे, स्पर्धेत टिकायचे असेल तर ग्राहक स्नेही व्हावे - जगन्नाथ शिंदे

इमेज
कॉपोरेट कंपन्यांच्या स्पर्धेत  टिकण्यासाठी औषध विक्रेत्यांनी ग्राहकस्नेही व्हावे- जगन्नाथ शिंदे  फार्मासिस्ट संघटीत न झाल्यास व्यवसाय संपुष्टात !           नाशिक : देशभरातील सर्वात मोठा औषध विक्रीचा व्यवसाय काबीज  करण्यासाठी मोठ्या भांडवलदारांच्या कॉपोरेट कंपन्या मोठ्या ताकदीने उतरल्या आहेत. या कॉपोरेट कंपन्यांच्या स्पर्धत टिकण्याासाठी लहान होलसेलर व रिटेलर फार्मासिस्टने एकत्रित येवून व्यवसाय केला पाहिजे. त्याचबराबेर पारंपारीक केमीस्टचे दुकान न ठेवता अद्यावत शॉपी करून ग्राहकांशी स्नेह वाढवून कौटूंबिक नाते निर्माण केले तरच फार्मसिस्ट टिकेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य केमीस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केले.  महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सील परिषदेच्या निवडणूकीच्या निमीत्ताने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये नाशिक विभागातून उमेदवारी करीत असलेले नाशिक केमीस्ट असो.चे अध्यक्ष अतुल अहिरे यांनी मविप्रच्या रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्रातील औषधी व्यवसाय व त्यासमोरील आव्हाने या विषयावर बेालताना शिंदे म्हणाले की, जग हे प

भारत माझा देश आहे चित्रपटाचा जवानांसाठी प्रिमिअर शो !

इमेज
जवानांनी पाहिला 'भारत माझा देश आहे' मराठी सिनेसृष्टीत सैनिकांसाठी प्रथमच चित्रपटाच्या प्रिमिअर शोचे आयोजन           मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे पांडुरंग कृष्णा जाधव दिग्दर्शित 'भारत माझा देश आहे'. नुकताच हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः बाल प्रेक्षकांचा. राजवीरसिंहराजे गायकवाड, देवांशी सावंत यांच्यासह या चित्रपटात मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम, हेमांगी कवी आणि नम्रता साळोखे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट प्रत्येक देशप्रेमीसाठी असला तरी हा चित्रपट सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाचा प्रिमिअर शो बेळगाव येथे सैन्य अधिकारी, जवान आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित करण्यात आला होता. मराठी सिनेसृष्टीत असे प्रथमच घडत आहे.             या विशेष शोबद्दल दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणतात, '' सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांवर अनेक चित्रपट आले आहेत. मात्र हा चित्रपट असा आहे, जो सैनिकांच्या कुटुंबियांवर भाष्य करण

मदतीसाठी आवाहन करण्याआधी मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था नासिक यांच्यावतीने मदत करण्यात आली- अध्यक्ष नरेंद्र पाटील

इमेज
 मदतीचे आवाहन, माध्यम क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करीत असलेले नासिकचे रामदास नागवंशी यांच्या पत्नीचे अकस्मात निधनाने त्यांच्यावर आलेल्या संकटातून सावरण्यासाठी ऐच्छिक मदत करावी असे वाटते. मदतीसाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक, बॅक खाते क्रमांक, गुगल पे क्यूआर कोड खाली दिलेला आहे. दानशूरांनी आपल्या इच्छेनुसार मदत केल्यास त्यांना हातभार लागेल.               काल दि. ७ में रोजी "मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था", नासिकच्या वतीने माध्यमकर्मी रामदास नागवंशी यांना आर्थिक मदत देण्यात आली.     दोन दिवसांपूर्वी रामदास नागवंशी यांच्या पत्नीचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नागवंशी अनेक वर्षांपासून नासिकच्या माध्यम क्षेत्रांत काम करीत आहेत. मात्र आजही त्यांच्याकडे स्वमालकीचे घर नाही की पैसा नाही. पत्नीच्या व स्वतः च्या तुटपुंज्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते आणि डोक्यावर असलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे तुटपुंज्या मानधनावर शक्य नव्हते, त्याचा परिणाम कर्ज रक्कम वाढण्यास कारणीभूत ठरत गेली तरीही दोघांनी स्वाभिमानी जीवन जगत शक्य होईल तितके समोर आलेल्या परिस्थितीला सा

जेव्हा विभागीय आयुक्त म्हणतात,,,,,,,‘तुमचा’ फोटो मी काढणार…!

इमेज
जेव्हा विभागीय आयुक्त म्हणतात,,,,,,,‘तुमचा’ फोटो मी काढणार…!      नासिक::- विभागीय उपसंचालक माहिती व जनसंपर्क यांच्या वतीने १ ते ५ मे पर्यंत आयोजित राज्यस्तरीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या समवेत उपस्थित अधिकाऱ्यांचे फोटो काढण्यात व्यस्त असलेले माहिती व जनसंपर्कचे छायाचित्रकार व कॅमेरामन फोटो पासून वंचित राहतील हे लक्षात येतांच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार व कॅमेरामन नेहमी आमचे फोटो काढतात. त्यामुळे  विभागीय आयुक्त यांनी तत्परतेने कॅमेरा हातात घेवून माहिती कार्यालयाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यासमवेत फोटो घेतला. यानिमित्ताने त्यांची वेगळी प्रतिमा यावेळी उपस्थितांना पहावयास मिळाली.

डेन्मार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन !

इमेज
डेन्मार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन ! नवी दिल्ली, ३ मे २०२२  सन्माननीय महोदय, डेन्मार्कचे पंतप्रधान, शिष्टमंडळातील सदस्य, प्रसार माध्यमातील मित्रहो,          शुभ संध्याकाळ आणि नमस्कार ! सन्माननीय पंतप्रधान, महोदय,  माझे आणि, आमच्या शिष्टमंडळाचे डेन्मार्कमध्ये  शानदार स्वागत आणि आदरातिथ्य केल्याबद्दल आपले आणि आपल्या चमूला हार्दिक धन्यवाद!         आपल्या या सुंदर देशाला मी पहिल्यांदाच भेट देत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारतामध्ये आपले स्वागत करण्याची संधी मला प्राप्त झाली होती. या दोन्ही दौर्‍यांमुळे आपण आपले संबंध अधिक घनिष्ठ बनवून त्यांना गती देऊ  शकलो. आपल्या दोन्ही देशात लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि कायद्याचे राज्य यासारखी सामायिक मुल्ये आहेत. त्याचबरोबर आपल्या दोन्ही देशांमध्ये अनेक पूरक बलस्थानेही आहेत. मित्रांनो,       ऑक्टोबर २०२० मध्ये भारत...डेन्मार्क आभासी शिखर परिषदेमध्ये आम्ही आपल्या संबंधांना हरित धोरणात्मक भागीदारीचा  दर्जा दिला होता. आमच्या आजच्या चर्चेच्या वेळी आम्ही आपल्या हरित धोरणात्मक भागीदारीच्या संयुक्त कार्य आराखड्याची 

कोरोनाकाळातही महाविकास आघाडी सकारचे काम अखंड सुरु; प्रदर्शनातील माहिती पाहून शासनाच्या कामगिरीचा अभिमान वाटला-भेट देणाऱ्या नागरिकांच्या भावना !

इमेज
जनसेवेची महाविकास आघाडी' ची मोहिमेंतर्गत सचित्र राज्यस्तरीय प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद कोरोनाकाळातही महाविकास आघाडी सकारचे काम अखंड सुरु; प्रदर्शनातील माहिती पाहून शासनाच्या कामगिरीचा अभिमान वाटला-भेट देणाऱ्या नागरिकांच्या भावना !       नाशिक, ( जिमाका )::-कोरोनाकाळात सगळे बंद असतांना महाविकास आघाडी सरकारने अखंड सेवा देऊन जनतेची सेवा केली आहे. तसेच शासनाने गेल्या दोन वर्षात रस्त्यापासून ते कृषी विकासापर्यंत असा सर्वांगीण विकास केला आहे. शासनाची दोन वर्षातील कामगिरी पाहून अभिमान वाटला, अशी भावना महानगरपालिकेचे उपशिक्षक अनिल माने यांनी व्यक्त केली.              मीडिया सेंटर, बी.डी.भालेकर मैदान, कवी कालिदास कलामंदिरासमोर  आयोजित ‘दोनवर्ष जनसेवेची महाविकास आघाडी' ची मोहिमेंतर्गत सचित्र राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या उपशिक्षक अनिल माने यांनी प्रदर्शनाच्या  भेटी प्रसंगी आपली भावना व्यक्त केली.              प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक योजनांची माहिती मिळाली. या सर्व योजना सर्व सामान्यांपर्यंत गेल्यास नक्कीच महाराष्ट्रात एकमेकांच्या बरोबर सगळ्यां