पायोनिअर हार्ट हॉंस्पिटलला ‘सीजीएचएस’ मान्यता

पायोनिअर हार्ट हॉंस्पिटलला ‘सीजीएचएस’ मान्यता !
नाशिक (प्रतिनिधी) : येथील पायोनिअर हार्ट हॉस्पिटलला सेंटर गव्हर्नमेंट हेल्थ स्किम (सीजीएचएस)ची मान्यता मिळाली आहे. हॉस्पिटलला सीजीएचएसची मान्यता मिळाल्यामुळे आता केंद्र सरकारच्या सेवेत सध्या कार्यरत असलेले  अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्त कर्मचार्‍यांचे मोफत उपचार पायोनिअर हार्ट हॉस्पिटलमध्ये होणार आहेत. पायोनिअर हार्ट हॉस्पिटल नाशिकमधील अग्रगण्य असून गेल्या ३ वर्षांपासून हृदयरोगावरील उत्कृष्ट सेवा देणारे हॉस्पिटल म्हणून नावलौकिक मिळवला आहे. 
हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णास इमर्जन्सी उपचार, एन्जीओप्लास्टी तसेच बायपास(सिएबीजी)शस्त्रक्रिया येथे यशस्वीपणे केल्या जातात. डॉ. सुरेश सूर्यवंशी या हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभागाचे प्रमुख असून हृदययावरील उपचाराचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.

डॉ. ललित लवणकर हे उत्तर महराष्ट्रातील एकमेव बालहृदयरोग तज्ज्ञ आहेत. नवजात शिशू मधील हृदयरोगावरील विविध उपचार करण्यात ते निपुण आहेत. हॉस्पिटलमधील अवघ्या ९५० ग्रॅम वजनाच्या बाळाची यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांनी या गोंडस शिशूला नवजीवन दिले आहे.  बाळांच्या अशा हृदय आजारावरील क्लिष्ट आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून त्यांनी अनेक बाळांना नवसंजीवनी दिली आहे. 
हॉस्पिटलमध्ये अतिशय उत्तम आणि अनुभवी डॉक्टरांचा चमू रुग्णसेवा देत असून त्यामधे हृदयशल्यविशारद  डॉ. नितीन ठाकरे आणि डॉ.  निलेश पूरकर या दोन्ही तज्ज्ञाचा बायपास, हृदय झडपांच्या शस्त्रक्रियांसह इतर अनेक अवघड आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात हातखंडा आहे. हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध असून उच्च वैद्यकीय नीतिमत्ता जोपासून रुग्णसेवा देण्यासाठी डॉक्टरांसह सर्व स्टाफ कटिबद्ध असतो.
 सेंटर गव्हर्नमेंट हेल्थ स्किम मुळे आता केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा फायदा रुग्णांना होणार आहे. पायोनिअर हार्ट हॉस्पिटलमध्ये सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून अनेक गोरगरीब रुग्णांवर  उपचार केले जातात. त्यासाठी दिल दोस्ती फाऊंडेशन आणि अशा सेवाभावी संस्थाचे सहकार्य नियमित लाभत असते. या वेळी डॉ. .सुरेश सुर्यवंशी, डॉ. ललित लवणकर, डॉ. नितीन ठाकरे, डॉ. वैशाली अग्रवाल, डॉ. निलेश चव्हाण उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।