जेव्हा विभागीय आयुक्त म्हणतात,,,,,,,‘तुमचा’ फोटो मी काढणार…!

जेव्हा विभागीय आयुक्त म्हणतात,,,,,,,‘तुमचा’ फोटो मी काढणार…!

     नासिक::- विभागीय उपसंचालक माहिती व जनसंपर्क यांच्या वतीने १ ते ५ मे पर्यंत आयोजित राज्यस्तरीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या समवेत उपस्थित अधिकाऱ्यांचे फोटो काढण्यात व्यस्त असलेले माहिती व जनसंपर्कचे छायाचित्रकार व कॅमेरामन फोटो पासून वंचित राहतील हे लक्षात येतांच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार व कॅमेरामन नेहमी आमचे फोटो काढतात.

त्यामुळे  विभागीय आयुक्त यांनी तत्परतेने कॅमेरा हातात घेवून माहिती कार्यालयाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यासमवेत फोटो घेतला. यानिमित्ताने त्यांची वेगळी प्रतिमा यावेळी उपस्थितांना पहावयास मिळाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रक्तदानाचे दीड शतक पूर्ण करणारा सेवाव्रती पत्रकार. विश्वविक्रमी रक्तदाते पत्रकार डॉ.दिलीप केदारनाथ कोठावदे यांचा प्रेरणादायी, भावस्पर्शी रक्तदान प्रवास

रविवारी मविप्रची ११२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा : सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. १,२२९ कोटींचे विक्रमी अंदाजपत्रक, ६०० हून अधिक सामंजस्य करार, ७,६१४ विद्यार्थ्यांना रोजगार......

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बहिस्थ परिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !