पोस्ट्स

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी व व्हीजे-एनटी यांचे आरक्षण ! समर्पित घटित आयोग राज्याच्या दौऱ्यावर ! नासिकला २२ में रोजी,,,,

इमेज
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी व व्हीजे-एनटी यांचे आरक्षण ! समर्पित घटित आयोग २२ मे रोजी नाशिक विभागीय दौऱ्यावर ! नागरिकांना व सामाजिक संघटनांना मते व निवेदने सादर करण्यासाठी अगोदरच करावी लागणार नाव नोंदणी !       नाशिक, दि.१३ मे, (जिमाका वृत्तसेवा): राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ओबीसी, व्हिजे-एनटी यांना आरक्षणासाठी घटित केलेल्या समर्पित आयोगाचा राज्यभर विभागस्तरावर भेटींचा कार्यक्रम जाहिर झाला असून, २२ मे, २०२२ रोजी आयोग नाशिक विभागीय दौऱ्यावर असून, या दौऱ्यात नागरिकांची व या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांची निवेदने स्विकारण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आगेादर नाव नोंदणी करावी लागणार आहे.            यासंदर्भात आयोगामार्फत जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकानुसार महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, शहरी क्षेत्रातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास म्हणजे ओबीसी, व्हिजे-एनटी  यांना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयान

आरोग्य सेवा देताना फ्लाॅरेंस नाईटिंगेल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आरोग्य सेवा द्यावी - डॉ. सुशीलकुमार वाकचौरे

इमेज
आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामध्ये जागतिक परिचारिका दिन संपन्न !         नासिक::- १२ मे २०२२ रोजी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे फ्लाॅरेंस नाईटिंगेल यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉक्टर सुशीलकुमार वाकचौरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले, याप्रसंगी कार्यालयातील कार्यरत कर्मचारी तसेच विभागीय जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी उपस्थित होते, यावेळी फ्लोरेंस नाईटिंगेल यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या कामाचे महत्त्व सगळ्यांना सांगण्यात आले उपस्थित आरोग्य सेविकांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला सर्व आरोग्य सेवक सेविका यांना आपली आरोग्य सेवा देताना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आरोग्य सेवा द्यावी असे आवाहन याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर सुशील कुमार वाकचौरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती अर्चना जोशी, श्रीमती सरिता पानसरे, अधिपरीचारिका श्रीमती अस्मिता गेडाम यांनी विशेष प्रयत्न केले.

नाशकात होणाऱ्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात विविध प्रस्ताव पारित करणार ! --आर. मुरली कृष्णन, अखिल भारतीय विद्युत मजदूर संघ

इमेज
अखिल भारतीय विद्युत मजदूर संघाचे १४ व १५ मे ला १७ वे त्रैवार्षिक अधिवेशन  दोन दिवसीय अधिवेशनात विविध प्रस्ताव पारित करणार !         नाशिक : भारतीय मजदूर संघ या देशातील एक क्रमांकाच्या केंद्रीय कामगार संघटनेला संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्युत कामगार महासंघाच्या सुवर्ण जयंती वर्षातील १७ वे त्रैवार्षिक अधिवेशन १४ व १५ मे रोजी नाशिक येथे संपन्न होत असल्याची माहीती अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे अध्यक्ष  आर.मुरली कृष्णन, महामंत्री अमर सिंह, उप महामंत्री अरूण देवांगण, प्रभारी विद्युत क्षेत्राचे अख्तर हुसेन, केंद्रीय सचिव जयेंद्र गढवी, संघटन मंत्री विलास झोडगेकर व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एल.पी.कटकवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.           कोविड प्रतिबंधासाठी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करून पुणे विद्यार्थी वसतीगृह संचलित देवधर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशास्त प्रांगणात होत असलेल्या अधिवेशनासाठी २० राज्यातील ५०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.           १४ मे २०२२ रोजी होणार्‍या ऐतिहासिक अधिवेशनाचे उद्घाटन अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे संस्थापक सदस्य

ब्रह्माकुमारी मुख्यालयाकडून शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न..!

इमेज
नाशिकच्या ब्रह्माकुमारी मुख्यालयाकडून पिंपळगाव बसवंत येथे शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न..!      नाशिक (तेजश्री उखाडे) :- ब्रह्माकुमारी नाशिकच्यावतीने पिंपळगाव बसवंत येथे भव्य आत्म निर्भर शेतकरी मेळावा उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न झाला.     विशेषतः यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी योगिक व सेंद्रिय शेतीचा कानमंत्र प्राप्त करून घेतला.  बांबू लागवड ही अतिशय सोपी विना खर्चिक व अनासायास होणारे उत्पादन असून या फायदेशीर शेती कडे शेतकऱ्यांनी आपले योगदान द्यावे असे पाशाभाई पटेल यांनी विषद केले. तसेच पिंपळगाव बसवंत येथे जगातील १९८ देशातील ५०० शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन चार हजार पानांचा रिपोर्ट वातावरणीय बदलाविषयी तयार केला आहे. यानुसार २०५० पर्यंत जगातील सागर किनारपट्टीवरील अनेक शहरे, बेट् व देश पाण्याखाली जाणार आहेत. भविष्या आपली पिढी अबाधित ठेवायचे असेल तर वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करणे अतिशय गरजेचे आहे. थर्मल पावर किंवा इतर अनेक मार्गांनी वातावरणात मोठ्या प्रमाणात co2 हा सोडला जातो. यापासून वाचायचे असल्यास बांबू लागवड अतिशय उपयुक्त असल्याचे मत पाशा पटेल यांनी बोलतांना प्रतिपादित केले.

आजचे नवोन्मेषी शोध ही भविष्याची जीवनशैली असेल- डॉ. भारती प्रवीण पवार

इमेज
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी अटल इनोव्हेशन मिशन- प्राइम प्लेबुक आणि स्टार्ट-अप शोकेसचे केले उद्घाटन. आजचे नवोन्मेषी शोध ही भविष्याची जीवनशैली असेल: डॉ भारती प्रवीण पवार        नवी दिल्ली::- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार  यांनी आज नवी दिल्ली डॉ आंबेडकर अंतरराष्ट्रीय केन्द्र येथे अटल इनोव्हेशन मिशन- प्राइम (PRIME संशोधकांसाठी नवोन्मेष, बाजारपेठेची उपलब्धता आणि उद्यमशीलतेसाठी कार्यक्रम) प्लेबुक आणि स्टार्ट-अप शोकेसचे उद्घाटन केले.           "केन्द्र सरकारने "चौकटीबाहेरच्या संकल्पना हेरल्या" आणि मेक-इन-इंडिया कार्यक्रम सुरू केला.  त्याने आरोग्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रांना चालना दिली आहे. "येत्या दशकात,  वैद्यकीय उपकरणे, निदान प्रणाली, प्रथिने-आधारित जीवशास्त्र, पारंपारिक औषध इत्यादींसह आरोग्य सेवा उत्पादनांचा भारत प्रमुख निर्यातदार बनेल. जर आपल्याला संशोधन-आधारित नवकल्पना आणि संपत्ती निर्मितीचे एक शाश्वत व्यवस्था  तयार करायची  असेल, तर आपल्याला तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण करणे आवश्यक

पायोनिअर हार्ट हॉंस्पिटलला ‘सीजीएचएस’ मान्यता

इमेज
पायोनिअर हार्ट हॉंस्पिटलला ‘सीजीएचएस’ मान्यता ! नाशिक (प्रतिनिधी) : येथील पायोनिअर हार्ट हॉस्पिटलला सेंटर गव्हर्नमेंट हेल्थ स्किम (सीजीएचएस)ची मान्यता मिळाली आहे. हॉस्पिटलला सीजीएचएसची मान्यता मिळाल्यामुळे आता केंद्र सरकारच्या सेवेत सध्या कार्यरत असलेले  अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्त कर्मचार्‍यांचे मोफत उपचार पायोनिअर हार्ट हॉस्पिटलमध्ये होणार आहेत. पायोनिअर हार्ट हॉस्पिटल नाशिकमधील अग्रगण्य असून गेल्या ३ वर्षांपासून हृदयरोगावरील उत्कृष्ट सेवा देणारे हॉस्पिटल म्हणून नावलौकिक मिळवला आहे.  हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णास इमर्जन्सी उपचार, एन्जीओप्लास्टी तसेच बायपास(सिएबीजी)शस्त्रक्रिया येथे यशस्वीपणे केल्या जातात. डॉ. सुरेश सूर्यवंशी या हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभागाचे प्रमुख असून हृदययावरील उपचाराचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. डॉ. ललित लवणकर हे उत्तर महराष्ट्रातील एकमेव बालहृदयरोग तज्ज्ञ आहेत. नवजात शिशू मधील हृदयरोगावरील विविध उपचार करण्यात ते निपुण आहेत. हॉस्पिटलमधील अवघ्या ९५० ग्रॅम वजनाच्या बाळाची यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांनी या गोंडस शिशूला नवजीवन दिले आहे.  बाळांच्या अशा हृदय आ

जग हे पेशंट केअर आहे, स्पर्धेत टिकायचे असेल तर ग्राहक स्नेही व्हावे - जगन्नाथ शिंदे

इमेज
कॉपोरेट कंपन्यांच्या स्पर्धेत  टिकण्यासाठी औषध विक्रेत्यांनी ग्राहकस्नेही व्हावे- जगन्नाथ शिंदे  फार्मासिस्ट संघटीत न झाल्यास व्यवसाय संपुष्टात !           नाशिक : देशभरातील सर्वात मोठा औषध विक्रीचा व्यवसाय काबीज  करण्यासाठी मोठ्या भांडवलदारांच्या कॉपोरेट कंपन्या मोठ्या ताकदीने उतरल्या आहेत. या कॉपोरेट कंपन्यांच्या स्पर्धत टिकण्याासाठी लहान होलसेलर व रिटेलर फार्मासिस्टने एकत्रित येवून व्यवसाय केला पाहिजे. त्याचबराबेर पारंपारीक केमीस्टचे दुकान न ठेवता अद्यावत शॉपी करून ग्राहकांशी स्नेह वाढवून कौटूंबिक नाते निर्माण केले तरच फार्मसिस्ट टिकेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य केमीस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केले.  महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सील परिषदेच्या निवडणूकीच्या निमीत्ताने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये नाशिक विभागातून उमेदवारी करीत असलेले नाशिक केमीस्ट असो.चे अध्यक्ष अतुल अहिरे यांनी मविप्रच्या रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्रातील औषधी व्यवसाय व त्यासमोरील आव्हाने या विषयावर बेालताना शिंदे म्हणाले की, जग हे प