ब्रह्माकुमारी मुख्यालयाकडून शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न..!

नाशिकच्या ब्रह्माकुमारी मुख्यालयाकडून पिंपळगाव बसवंत येथे शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न..!
     नाशिक (तेजश्री उखाडे) :- ब्रह्माकुमारी नाशिकच्यावतीने पिंपळगाव बसवंत येथे भव्य आत्म निर्भर शेतकरी मेळावा उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न झाला. 
   विशेषतः यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी योगिक व सेंद्रिय शेतीचा कानमंत्र प्राप्त करून घेतला.  बांबू लागवड ही अतिशय सोपी विना खर्चिक व अनासायास होणारे उत्पादन असून या फायदेशीर शेती कडे शेतकऱ्यांनी आपले योगदान द्यावे असे पाशाभाई पटेल यांनी विषद केले.

तसेच पिंपळगाव बसवंत येथे जगातील १९८ देशातील ५०० शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन चार हजार पानांचा रिपोर्ट वातावरणीय बदलाविषयी तयार केला आहे. यानुसार २०५० पर्यंत जगातील सागर किनारपट्टीवरील अनेक शहरे, बेट् व देश पाण्याखाली जाणार आहेत. भविष्या आपली पिढी अबाधित ठेवायचे असेल तर वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करणे अतिशय गरजेचे आहे. थर्मल पावर किंवा इतर अनेक मार्गांनी वातावरणात मोठ्या प्रमाणात co2 हा सोडला जातो. यापासून वाचायचे असल्यास बांबू लागवड अतिशय उपयुक्त असल्याचे मत पाशा पटेल यांनी बोलतांना प्रतिपादित केले. याशिवाय खरतरं भविष्यातील बांबू लागवड ही अतिशय सोपी विना खर्चिक व अनायास होणारे उत्पादन असून या फायदेशीर शेतीकडे शेतकऱ्यांनी आपले योगदान द्यावे व समाजाला व पर्यायाने आपला वातावरणीय बदलापासून बचाव करावा अशी कळकळीची विनंती पाशाभाई पटेल यांनी शेवटी बोलतांना केली. 

          दरम्यान, पिंपळगाव बसवंत येथील प्रमिला लॉन्स येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, नाशिकतर्फे भव्य आत्म निर्भर शेतकरी मेळाव्याचे आयोजन दिनांक २३ एप्रिल रोजी करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाशाभाई पटेल बोलत होते. प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले याप्रसंगी माउंट आबू वरून राजयोगी ग्राम कृषी व ग्राम विकास प्रभागाचे मुख्यालय समन्वयक ब्रह्माकुमार राजू भाईजी यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबतच कृषी तज्ञ बाळासाहेब घुगे इचलकरंजी वरून उपस्थित होते. तसेच कृषी अधिकारी धनंजय वार्डेकर, सह्याद्री फार्मचे विलास शिंदे, पुणे उपक्षेत्र संचालिका ब्रह्मा कुमारी सुनंदा दीदी, नाशिकच्या उपक्षेत्र मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी पिंपळगावचे सरपंच अलकाताई बनकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्यालय माऊंट आबू येथून खास उपस्थित ग्रामविकास प्रभागाचे मुख्यालय समन्वयक राजू भाईजी यांनी राज योगच्या माध्यमातून योगिक शेती कशी केली जाते तसेच ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे कशाप्रकारे सर्व स्तरातून लोकांच्या संस्कार परिवर्तनातून नव समाजाची निर्मिती केली जात आहे याविषयी विस्तृत विवेचन केले. 
     शाश्वत यौगिक व विषमुक्त शेती कशी करावी याचे सोदाहरण स्पष्टीकरण इचलकरंजी येथून उपस्थित प्रयोगशील शेतकरी ब्रह्माकुमार बाळासाहेब रुगे यांनी दिले. आपल्या विचारांमध्ये अलौकिक शक्ती असते या विचारांच्या माध्यमातून आपण आपल्या जमिनीला, बियाणांना व आलेल्या पिकांना आध्यात्मिक प्रकंपन दिल्यास चांगले उत्पादन येऊ शकते असे बाळासाहेबांनी सांगितले. जगदीशचंद्र बोस यांचे उदाहरण देत वनस्पतींना संवेदना असतात व अध्यात्मिक सूक्ष्म शक्तीतून आपण आपल्या जमिनीशी पिकाची बी-बियाणांशी जर बोललो तर त्यावर निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येतो. धार्मिक दृष्ट्या जरी बघितले तरी गीता, कुराण, बायबल अशा अनेक मुख्य धर्म शास्त्रांमध्ये वनस्पती, भुमाता, निसर्गावर प्रेम करायला शिकवले आहे, त्यामुळे आपण योगिक शेतीचा प्रयोग करून आपले व आपल्या समाजाचे असाध्य रोगापासून रक्षण करायला हवे असे प्रतिपादन बाळासाहेब रुगे यांनी याप्रसंगी केले. 
      रिफाइंड तेल आरोग्यासाठी खूप घातक आहे यात hexin नावाचे एक पेट्रोकेमिकल वापरले जाते. यामुळे शरीरात अनेक आजार निर्माण होतात. लोकांमध्ये  मोस येण्याचे प्रमाण वाढण्या मागे सुद्धा या तेलातील hexin कार्सोजेनिक हे रसायन असून यातून कॅन्सरही होऊ शकतो त्यामुळे लाकडी व लोखंडी घाण्याचे रिफाइंड न केलेले तेल आपल्या शरीराला खूप उपयुक्त आहे. मात्र त्याचा वास येत असल्याने हे तेल जसेच्या तसे घेणे अयोग्य असल्याचा अपप्रचार करण्यात आला अशी माहिती कृषी तज्ञ धनंजय वार्डेकर यांनी दिली. 
      सेंद्रिय व रसायनमुक्त शेती ही भविष्यातील काळाची गरज असून त्यादृष्टीने पाऊले उचलण्याची गरज आहे, तेव्हाच आपण आत्मनिर्भर होऊ शकतो असे सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांनी सांगितले. 
ब्रह्माकुमारी सुनंदा दीदीजी यांनी प्रॅक्टिकल राजयोग मेडिटेशनद्वारे सभेत उपस्थित शेतकऱ्यांना आंतरिक जगाची यात्रा घडवून आणली. 
ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी  राजयोगाचे महत्व विशद करत सर्वांनी जवळच्या ब्रह्मा कुमारी आश्रमात हा राजयोग चा कोर्स मोफत घ्यावा असे आवाहन केले. 
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्मा कुमारी पुष्पा दीदी व ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी सूत्रबद्ध पद्धतीने केले. शेवटी आभार प्रदर्शन कोपरगावच्या  ब्रम्हाकुमारी सरला दीदी यांनी केले. 
            ब्रह्माकुमार ओंकार यांनी ईशस्तवन गीत गाऊन लोकांमध्ये आध्यात्मिक ज्योत प्रज्वलीत केली. डी फोर डान्स अकॅडमी चे संजय सोनार व ग्रुपने उत्कृष्ट पदन्यास करत श्रोत्यांमध्ये देशभक्ती जागृत केली, कार्यक्रमात संत सावता माळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश खोडे,  अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश खोडे, शिवरुद्र फार्मचे संदीप उखाडे, गेन कंपनीचे नोडल ऑफिसर संतोष वाघमारे, स्मिथ अकॅडमीचे राजेश बेदमुथा, मांजरगाव सोसायटीचे अध्यक्ष भास्करराव सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष सोनवणे, मविप्रचे माजी संचालक दिलीप मोरे, सरपंच परिषदेचे राज्य समन्वयक प्रकाश महाले, प्रयोगशील शेतकरी ब्रह्माकुमार रामनाथ भाई आदी मान्यवरांचा सत्कार ब्रह्मकुमारी वासंती दीदी यांच्या हस्ते करण्यात आला

       कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. यावेळी प्रभात फेरीचे उद्घाटन येथील सरपंच अलकाताई बनकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ब्रह्मकुमारी संस्थेच्या उपक्षेत्र मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी, ब्रह्माकुमारी विना दीदी, ब्रह्मकुमारी गोदावरी दीदी ब्रह्मकुमारी ज्योती दीदी ब्रह्मकुमारी स्वरूपा दीदी, ब्रह्मकुमारी आरती दीदी अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ब्रम्हा कुमार रमेश खोडे, संत सावता माळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश खोडे आदी मान्यवर व शेतकरी आणि ब्रह्माकुमारी साधक सहभागी झाले होते. प्रभात फेरीचे उत्तमरीत्या संयोजन ब्रह्माकुमार बाळासाहेब सोनवणे यांनी केले. या भव्य फेरीत विविध कृषीविषयक सुविचारांचे फलक घेऊन तसेच घोषवाक्य देऊन येथील नागरिकांना सुतोवाच करण्यात आले. प्रमिला लॉन्स येथून या प्रभात फेरीची सुरुवात होऊन स्टेट बँक, बाजार पेठ ते ग्रामपंचायत पुन्हा संपूर्ण पिंपळगाव बसवंत गाव बाजारपेठेतून इत्यादी विविध ठिकाणाहून प्रभात फेरीचे समापन प्रमिला लॉन्स येथे करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा. पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

महिला शिक्षणाधिकारी व लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

पोलिस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !