आरोग्य सेवा देताना फ्लाॅरेंस नाईटिंगेल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आरोग्य सेवा द्यावी - डॉ. सुशीलकुमार वाकचौरे


आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामध्ये जागतिक परिचारिका दिन संपन्न !
 
      नासिक::- १२ मे २०२२ रोजी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे फ्लाॅरेंस नाईटिंगेल यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉक्टर सुशीलकुमार वाकचौरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले, याप्रसंगी कार्यालयातील कार्यरत कर्मचारी तसेच विभागीय जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी उपस्थित होते, यावेळी फ्लोरेंस नाईटिंगेल यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली.

तसेच त्यांच्या कामाचे महत्त्व सगळ्यांना सांगण्यात आले उपस्थित आरोग्य सेविकांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला सर्व आरोग्य सेवक सेविका यांना आपली आरोग्य सेवा देताना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आरोग्य सेवा द्यावी

असे आवाहन याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर सुशील कुमार वाकचौरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती अर्चना जोशी, श्रीमती सरिता पानसरे, अधिपरीचारिका श्रीमती अस्मिता गेडाम यांनी विशेष प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!