आजचे नवोन्मेषी शोध ही भविष्याची जीवनशैली असेल- डॉ. भारती प्रवीण पवार

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी अटल इनोव्हेशन मिशन- प्राइम प्लेबुक आणि स्टार्ट-अप शोकेसचे केले उद्घाटन.

आजचे नवोन्मेषी शोध ही भविष्याची जीवनशैली असेल: डॉ भारती प्रवीण पवार

       नवी दिल्ली::- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार  यांनी आज नवी दिल्ली डॉ आंबेडकर अंतरराष्ट्रीय केन्द्र येथे अटल इनोव्हेशन मिशन- प्राइम (PRIME संशोधकांसाठी नवोन्मेष, बाजारपेठेची उपलब्धता आणि उद्यमशीलतेसाठी कार्यक्रम) प्लेबुक आणि स्टार्ट-अप शोकेसचे उद्घाटन केले.

          "केन्द्र सरकारने "चौकटीबाहेरच्या संकल्पना हेरल्या" आणि मेक-इन-इंडिया कार्यक्रम सुरू केला.  त्याने आरोग्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रांना चालना दिली आहे. "येत्या दशकात,  वैद्यकीय उपकरणे, निदान प्रणाली, प्रथिने-आधारित जीवशास्त्र, पारंपारिक औषध इत्यादींसह आरोग्य सेवा उत्पादनांचा भारत प्रमुख निर्यातदार बनेल. जर आपल्याला संशोधन-आधारित नवकल्पना आणि संपत्ती निर्मितीचे एक शाश्वत व्यवस्था  तयार करायची  असेल, तर आपल्याला तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण करणे आवश्यक आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या.
          या अनुषंगाने, एआयएम पीआरआयएमई (संशोधकांसाठी नवोन्मेष, बाजारपेठेची उपलब्धता आणि उद्यमशीलतेसाठी कार्यक्रम) हा कार्यक्रम सर्व महत्वाच्या क्षेत्रांमध्ये सक्षम स्वदेशी उत्पादन क्षमता निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा उद्देश पूर्ण करेल.” या उपक्रमासाठी नीती आयोगाचे अभिनंदन करताना डॉ.भारती प्रवीण पवार म्हणाल्या की, आजचे नवोन्मेषी शोध ही भविष्यातील जीवनशैली असेल. 
           "प्राचीन काळापासून आपला दृष्टिकोन नेहमीच नवोन्मेषी राहिला आहे. भारताने जगाला आयुर्वेद, योग आणि शून्याची संकल्पना दिली. जागतिक स्तरावर नवकल्पनांना आकार देण्यात भारताने सक्रिय भूमिका बजावली आहे असे त्या म्हणाल्या." विशेषत: कोविड महामारीच्या काळातील देशाच्या नवोन्मेषी परिसंस्थेच्या प्रगतीकडे त्यांनी लक्ष वेधले. जागतिक नवोन्मेषी पटलावर भारत सातत्याने सुधारणा करत आहे. "महामारीच्या काळात आरोग्य सेवा क्षेत्र केंद्रस्थानी आले, तेव्हा आपल्या नवउद्यमांनी (स्टार्ट-अप्स) निदान, पीपीई, व्हेंटिलेटर आणि शेवटच्या घटकापर्यंत लस वितरणामध्ये चमकदार कामगिरी करत महत्त्वपूर्ण योगदान दिले हे आपण पाहिलेच आहे. यातून भारतीय आरोग्य सेवा क्षेत्रातील समस्या सोडवण्याची भारतीय स्टार्ट-अपची क्षमता दिसून आली असे त्यांनी नमूद केले. 
         "प्रेरणा हा प्रत्येक यशस्वी नवकल्पनाचा उत्प्रेरक घटक असतो" अशा शब्दात त्यांनी संशोधकांना प्रोत्साहीत केले. संशोधकांनी देशात संशोधन आणि विकास आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत,  त्यामुळे नागरिकांना फायदा होईल असे आवाहनही त्यांनी केले.
        नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. सुमन बेरी, नीती आयोगाचे सदस्य, डॉ. व्ही के पॉल, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार  डॉ. अजय सूद, निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन संचालक, डॉ. चिंतन वैष्णव  उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !