आवाज की दुनिया का बेताज बादशहा ! तुम मुझे यु भुला न पाओगे.
आवाज की दुनिया का बेताज बादशहा ! तुम मुझे यु भुला न पाओगे. स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेले पार्श्वगायक मोहम्मद (महम्मद) रफी यांचा ३१ जुलै हा स्मृतिदिन. रफींना जाऊन आज ४० हून अधिक वर्षे लोटली असली तरी त्यांचा आवाज भारतीय संगीत रसिकांच्या कानावर पडला नाही , असा एकही दिवस गेला नसेल. गेल्या कित्येक वर्षांत अनेकांनी ' प्रति रफी ' बनण्याचा प्रयत्न केला. मात्र , कोणालाही रफींच्या जवळपासही फिरकता आले नाही, यातच रफींच्या गायकीचे वेगळेपण अधोरेखित होते. रफींनी अजरामर केलेल्या गीतांची यादी अफाट असून त्यांच्या क्या हुआ तेरा वादा...( हम किसीसे कम नही ), बहारों फूल बरसाओ...(सूरज), बाबूल की दुवाएँ लेती जा...(नीलकमल), ए रेश्मी जुल्फें...(दो रास्ते), उड़े जब जब जुल्फें तेरी ...(नया दौर), ओ दुनिया के रखवाले... (बैजू बावरा) आदी गीतांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांनी उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलगू भाषेतही गाणी गायली. त्यांचे ‘हा रुसवा सोड सखे...’ हे गाणे ऐकताना एक अमराठी माणूस गातोय असे कुठेच जाणवत नाही. रफी यांनी अनेक पार्श्वगायिकांसोबत गाणी गायली. विशेषत: लता मंगेशकर