आवाज की दुनिया का बेताज बादशहा ! तुम मुझे यु भुला न पाओगे.


आवाज की दुनिया का बेताज बादशहा  !
 

तुम मुझे यु भुला न पाओगे.

       स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेले पार्श्वगायक मोहम्मद (महम्मद) रफी यांचा  ३१ जुलै हा स्मृतिदिन. रफींना जाऊन आज ४० हून अधिक वर्षे लोटली असली तरी त्यांचा आवाज भारतीय संगीत रसिकांच्या कानावर पडला नाही, असा एकही दिवस गेला नसेल.  गेल्या कित्येक वर्षांत अनेकांनी 'प्रति रफी' बनण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणालाही रफींच्या जवळपासही फिरकता आले नाही, यातच रफींच्या गायकीचे वेगळेपण अधोरेखित होते. रफींनी अजरामर केलेल्या गीतांची यादी अफाट असून त्यांच्या  क्या हुआ तेरा वादा...(हम किसीसे कम नही),बहारों फूल बरसाओ...(सूरज), बाबूल की दुवाएँ लेती जा...(नीलकमल), ए रेश्मी जुल्फें...(दो रास्ते), उड़े जब जब जुल्फें तेरी ...(नया दौर), ओ दुनिया के रखवाले... (बैजू बावरा) आदी गीतांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांनी उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलगू भाषेतही गाणी गायली. त्यांचे ‘हा रुसवा सोड सखे...’ हे गाणे ऐकताना एक अमराठी माणूस गातोय असे कुठेच जाणवत नाही. रफी यांनी अनेक पार्श्वगायिकांसोबत गाणी गायली. विशेषत: लता मंगेशकर व आशा भोसले यांच्यासोबतची त्यांची गाणी तुफान गाजली. यामध्ये 'अच्छा जी मै हारी...' या गाण्याची मजा काही औरच आहे.  मधुबाला व देव आनंद यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत पडद्यावर जितके पहायला छान वाटते  तितकेच ते रफी आणि आशाताईंच्या स्वरातील लाडिक व खोडकरपणामुळं ऐकायलाही छान वाटते. हीच रफींची महानता होती. त्यांना विनम्र अभिवादन.  

प्रा. विजय कोष्टी,

कवठेमहांकाळ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रविवारी मविप्रची ११२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा : सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. १,२२९ कोटींचे विक्रमी अंदाजपत्रक, ६०० हून अधिक सामंजस्य करार, ७,६१४ विद्यार्थ्यांना रोजगार......

रक्तदानाचे दीड शतक पूर्ण करणारा सेवाव्रती पत्रकार. विश्वविक्रमी रक्तदाते पत्रकार डॉ.दिलीप केदारनाथ कोठावदे यांचा प्रेरणादायी, भावस्पर्शी रक्तदान प्रवास

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बहिस्थ परिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !