आज रंगणार रफीगीतांची विनामूल्य सुरेल मैफल !

आज रंगणार रफीगीतांची विनामूल्य सुरेल मैफल !
रविवारी प.सा.नाट्यगृहात रंगणार
रफीगीतांची सुरेल मैफल !!
     
         नाशिक( प्रतिनिधी) - सदाबहार श्रेष्ठ गायक मोहम्मद रफी हा दैवी चमत्कार होता. त्यांच्या गाण्यांचे आजही अनेक चाहते आहेत. या लोकप्रिय पार्श्वगायकाने १९४९ ते १९८० पर्यंतची तीन दशके आपल्या सुरेल गाण्यांनी श्रोत्यांना मोहित केले. रविवारी ३१ जुलै रोजी त्यांचा ४२ वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने
 'मुझे तुमसे मोहब्बत है' या बहारदार मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता प.सा. नाट्यगृहात ही विनामूल्य मैफल होईल.
         
        
        लोकप्रिय गायक घनश्याम पटेल या मैफलीचे संयोजक आहेत. गेली १० वर्षे ते सातत्याने हा उपक्रम राबवतात. अगदी कोरोनाच्या काळातही दोन वर्षे ऑनलाईन कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वर्गीय सुरांचे सुरेल गायक मोहम्मद रफी यांनी आपल्या ३१ वर्षांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. हिंदीसह मराठी, ऊर्दू, पंजाबी, तेलुगु व अन्य अनेक भाषांमध्येही त्यांनी पार्श्वगायन केले. ६ फिल्मफेअर अवॉर्डसह राष्ट्रीय पुरस्कार तसेच पद्मश्री किताबाने रफी साहेबांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांची लोकप्रिय गाणी कराओके म्युझिक ट्रॅक समवेत नाशिकचे हौशी कलाकार सादर करणार आहेत. प्रमुख गायक घनश्याम पटेल यांच्यासह राज ढगे, हरीशभाई ठक्कर, सुनील पाठक, अंजली चव्हाण, सानिका जैन, भाग्यश्री गायधनी, शिल्पा गोसावी, उषा मोदी हे कलाकार रफी साहेबांची गाणी सादर करतील. 
          या मैफलीचे निवेदन उस्मान पटणी करणार असून प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  या मैफलीसाठी नाशिककर रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. वयाची पन्नाशी उलटलेले अनेकजण रफी साहेबांच्या गाण्यांचे चाहते आहेत. तसेच नव्या पिढीतील तरुणांनाही त्यांच्या गाण्यांचे आकर्षण आहे. जास्तीतजास्त रसिक श्रोत्यांनी या विनामूल्य मैफलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!